Manoj Jarange Patil | गेल्या काही दिवसांपासून मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj jarange Patil) यांनी सगेसोयरे ओबीसी आरक्षणाबाबत सरकारकडे मागणी केली होती. ओबीसी आरक्षणातून मराठा समाजाला आरक्षण द्यावं, अशी मागणी मराठा समाजाकडून होते. याच पार्श्वभूमीवर अंतरवाली सराटीतून मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) उपोषण करत आहेत. त्यांचा आज उपोषणाचा 16 वा दिवस आहे. आज त्यांची शेवटची बेठक असून त्यांना काही नेत्यांचा मारण्याचा प्लान असल्याचा दावा त्यांनी केला आहे.
मनोज जरांगे (Manoj Jarange Patil) यांची ओबीसीतून मराठा समाजाला आरक्षण देण्याबाबत मागणी आहे. यासाठी मनोज जरांगे पाटील (Manoj Jarnge Patil) यांची अंतरवाली सराटीमध्ये बैठक आहे. या बैठकीमध्ये मनोज जरांगे पाटील यांनी ही शेवटची बैठक असल्याचं सांगितलं असून त्यानंतर मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी एक धक्कादायक वक्तव्य केलं आहे. त्यांनी थेट नाव घेत काही नेत्यांचा मारण्याचा प्लॅन असल्याचा गंभीर आरोप केला आहे. यामध्ये पहिलं नाव हे देवेंद्र फडणवीस यांचं असल्याची माहिती आता समोर आली आहे.
जरांगेंचे थेट फडणवीसांवर आरोप
मनोज जरांगे पाटील यांची शेवटची बैठक सुरू आहे. आजचा उपोषणाचा सोळावा दिवस आहे. ओबीसीतून मराठा समाजाला आरक्षण द्यावं या मागणीवर ते ठाम आहेत. अशावेळी त्यांना मारण्याचा प्लॅन असल्याचा दावा केला आहे. अशामध्ये मनोज जरांगे पाटील यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार गटातील दोन आमदार आणि शिवसेना शिंदे गटातील दोन आमदारांनी मला संपवण्याचा प्लॅन केला आहे, असं धक्कादायक वक्तव्य केलं आहे.
सलाईनमधून विष घालण्याचा कट
“मनोज जरांगे पाटील यांनी अंतरवाली सराटीमध्ये बैठक घेत आपल्याला मारण्याचा कट असल्याचा धक्कादायक दावा केला आहे. यावेळी त्यांनी थेट अजित पवार आणि एकनाथ शिंदे गटातील दोन आमदार तसेच देवेंद्र फडणवीस यांचा प्लॅन आहे”, असं धक्कादायक वक्तव्य केलं आहे.
“सरकार मला संपवणार आहे. माझ्या सलाईनमध्ये विष टाकण्याचा प्रयत्न आहे. यामुळे मी सलाईन घेणं बंद केलं आहे. त्यांना कसही करून मला संपवायचं आहे. यामध्ये मोठ्या नेत्यांचा हात असल्याचं ते बोलले आहेत. मी सागर बंगल्यावर येतो मला मारून टाका”, असं म्हणत मनोज जरांगे पाटील यांनी गंभीर आरोप केला आहे. यामुळे मनोज जरांगे पाटील यांना फडणवीस यांची माफी मागावी”, लागल्याचं ते म्हणाले आहेत.
गेल्या काही दिवसांपासून मनोज जरांगे यांच्यावर संगीता वानखेडे आणि अजय महाराज यांनी धक्कादायक आरोप केला आहे. स्वत:च्या पब्लिक स्टंटसाठी सुरू आहे. मनोज जरांगे पाटील यांना काही कळत नाही असा आरोप केला गेला. त्यानंतर संगीता वानखेडे यांनी मनोज जरांगे यांना शरद पवारांचा फोन येतो, असा धक्कादायक दावा केला होता.
News Title – Manoj Jarange Patil Claim to Devendra fadanvis About kill him
महत्त्वाच्या बातम्या
मुंबईकरांसाठी चिंताजनक बातमी, तहान भागवणारी धरणे आटली
राज्यातील ‘या’ जिल्ह्यांना अलर्ट जारी; हवामान विभागाचा इशारा
‘या’ 3 स्कीममुळे व्हाल लखपती; महिन्याला गुंतवा फक्त 500 रुपये
उन्हाळ्यात पर्यटनासाठी ‘ही’ ठिकाणे ठरू शकतात बेस्ट ऑप्शन
“ममता बॅनर्जी आता ‘दीदी’ राहिल्या नाहीत, त्या आता ‘काकू’ झाल्या आहेत”






