‘हा’ बडा नेता मध्यरात्री मनोज जरांगेंच्या भेटीला!

On: March 17, 2024 11:26 PM
Manoj Jarange patil
---Advertisement---

Manoj Jarange Patil | मराठा आरक्षणासाठी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) हे अनेक महिन्यांपासून उपोषण आणि मोर्चे काढताना दिसत आहेत. अशातच मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) हे राज्यामध्ये दाैरे करताना दिसत आहेत. आचारसंहिता लागू झाली असून राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि भाजप नेते अशोक चव्हाण हे मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांच्या भेटीस गेले आहेत.

शनिवारी अशोक चव्हाण हे रात्री 11 वाजता मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांच्या भेटीसाठी गेले होते. त्यानंतर त्यांची रात्री 1 वाजेपर्यंत बैठक झाली होती. त्यावेळी अशोक चव्हाण यांनी मी प्रशासनाचा प्रतिनिधी म्हणून नाहीतर समाज म्हणून मी त्यांची भेट घेतली असल्याचं अशोक चव्हाण म्हणाले आहेत.

काय म्हणाले अशोक चव्हाण?

“मी आज प्रशासनाचा प्रतिनिधी म्हणून नाहीतर समाज म्हणून त्यांची भेट घेतली आहे. आपण याप्रक्रियेमध्ये याआधी देखील काम केलं आहे. यातून चर्चा करून समन्वयातून मार्ग काढणे गरजेचं आहे. कॅबिनेटमध्ये काय घडलं हे मला माहिती नाही. सगेसोयरे आध्यादेशावरही हरकती आल्या आहेत. आचारसंहिता लागू झाली आहे. त्यावरील प्रक्रिया कधी पूर्ण होईल हे सांगता येणार नाही”, असं अशोक चव्हाण म्हणाले.

“सरकारने फसवणूक केली आहे. हैदराबादचे जुने गॅजेट्स घेतले नाही. सगेसोयरेंची अंमलबजावणी केली नाही. गुन्हे मागे घ्यायचे सोडून अधिक गुन्हे दाखल केले आहेत”, असं अशोक चव्हाण म्हणाले आहेत.

मनोज जरांगे यांचं वक्तव्य

“समाजाच्या मागण्या प्रशासनाकडून होणारी फसवणूक अशोक चव्हाण यांच्यासमोर मांडली आहे. ते त्यांच्या परिने प्रयत्न करतील. आता आम्ही 24 मार्च रोजी समाजाची बैठक लावली आहे. त्यात मराठ्यांची पुढील दिशा ठरेल”, असं मनोज जरांगे म्हणाले आहेत.

गेले अनेक दिवसांपासून मनोज जरांगे पाटील हे मराठा आरक्षणासाठी आंदोलन आणि उपोषण करत आहेत. आता लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आचारसंहिता लागू झाली आहे. यामुळे मनोज जरांगे पाटील यांनी सावध पावित्रा घेत शांतता ठेवत, काही दिवसांमध्ये समाजाची बैठक लावली आहे, असं स्वत: मनोज जरांगे म्हणाले.

News Title – Manoj Jarange patil And Ashok chavan Meet

महत्त्वाच्या बातम्या

मराठी इंडस्ट्री का मागे आहे? गश्मीर महाजनी म्हणाला…

“वयाने लहान मुलाशी लग्न केलं तरी..”, बबिताजीची पोस्ट नेमकी कुणासाठी?

क्रिकेटप्रेमींना धक्का, निवडणुकांमुळे आयपीएलमध्ये मोठे बदल?,मोठी माहिती समोर

पेट्रोल-डिझेलच्या किंमती आणखी कमी होणार?, पेट्रोलियम मंत्र्यांचं मोठं वक्तव्य

जीवनात यशस्वी व्हायचं असेल तर ‘या’ सवयींचा त्याग करा!

 

Join WhatsApp Group

Join Now