“24 तारखेला अंतरवाली सराटीमध्ये…” ; मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा

On: March 21, 2024 6:09 PM
Manoj Jarange Patil
---Advertisement---

Manoj Jarange | मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील पुन्हा एकदा गावागावात जाऊन जाहिर सभा घेत आहेत. गेल्या काही दिवसांपूर्वी जरांगेंनी आंदोलन करत सरकारकडे आरक्षणाबाबत काही मागण्या केल्या होत्या. दरम्यान सरकारने विषेश अधिवेशन घेत जरांगेंच्या मागण्या पुर्ण केल्या. मराठा समाजाला 10 टक्के स्वातंत्र आरक्षण दिलं. मात्र, जरांगेंना ओबीसीमधून आरक्षण पाहिजे असल्याचं जरांगेंनी सांगितलं. त्यामुळे जरांगे राज्यभरात जाऊन जाहिर सभा घेत आहे. एवढंच नाही तर त्यांनी बीड येथे बैठका देखील घेतल्या. येत्या 24 तारखेला देखील अंतरवालीमध्ये बैठक पार पाडल्याचं जरांगेंनी सांगितलं. याबाबत त्यांनी एक घोषणा केली आहे.

काय म्हणाले जरांगे?

24 तारखेला होत असलेल्या बैठकतीत मराठ्यांच्या मातीची काय ताकत असते ते कळेल. सत्ताधारी आणि विरोधक हे मराठा समाजाच्या विरोधात आल्याचं पहायला मिळत आहेत. मात्र, ते चुकीच्या माणसाला भेटले असून, मी समाजाला दैवत मानतो, त्यामुळे मराठा समाजाने एकजूट दाखवावी असं (Manoj Jarange) जरांगे म्हणाले. आपल्यामध्ये फूट पडू देऊ नये असं म्हणत 24 तारखेला आंतरवाली या ठिकाणी महत्त्वाची बैठक होणार असल्याचं जरांगे म्हणाले. या बैठकीत मराठा समाजाच्या मताची ताकद काय असते यावर निर्णय होणार आहे. तर नऊशे एकरावर सभा कुठे घ्यायची याची देखील घोषणा या बैठकीत करण्यात येणार असल्याचं जरांगे म्हणालेत.

24 तारखेला मराठे डाव टाकणार-

बोलत असताना जरांगे (Manoj Jarange) म्हणाले की, मागच्या वेळेस सरकारने आश्वसन दिलं होतं त्यामुळे जरांगेंनी त्यांचं आंदोेलन मागे घेतलं होतं. मात्र आता हा कायदा लागू केला जात नसल्याने जरांगे यांनी यावरून देखील सरकारवर टीका केली आहे. सरकारने खोटे बोलून डाव टाकला असून आता 24 तारखेला मराठा डाव टाकतील.

आचारसंहिता लागण्याच्या अगोदर सरकारने सगे सोयरे आधी सूचना जारी करणार म्हणून कॅबिनेट बैठक घेतली होती. मात्र या बैठकीमध्ये कुठलाही निर्णय घेण्यात आला नाही. आचारसंहितेचं कारण पुढे करून सरकारने डाव जरी टाकला असला तरी 24 तारखेला जी महत्त्वाची बैठक होणार आहे, त्या बैठकीत आंदोलनाची पुढची दिशा ठरवण्यात येणार असल्याचं जरांगे म्हणालेत.

News Title : manoj jarange on maratha protest

महत्त्वाच्या बातम्या-

सर्वात मोठी बातमी! CSK ने बदलला कॅप्टन; धोनीचा मोठा निर्णय

गोळीबाराने पुणे हादरलं! गोळीबाराचं कारण ऐकून बसेल धक्का

“एकच आमदार असलेल्या पक्षासाठी भाजप..”, रोहित पवारांचा रोख कुणाकडे?

‘फडणवीसांनी मला पहाटे तीन वाजता…’; जरांगे पाटलांकडून मोठा गौप्यस्फोट

ए आर रहमानच्या तालावर चाहते नाचणार, IPL च्या मैदानात हे तारे रंगणार

Mrudula Jog

Mrudula Jog

Join WhatsApp Group

Join Now