“30 तारखेपर्यंत…”; लोकसभा निवडणुकीबाबत जरांगेंचा मोठा गौप्यस्फोट

On: March 27, 2024 7:21 PM
manoj jarange
---Advertisement---

Manoj Jarange | लोकसभा निवडणुकीआधी राज्यात अनेक घडामोडी घडताना दिसत आहेत. वंचितचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटलांसोबत नवी आघाडी केल्याची घोषणा केली आहे. एवढंच नाही तर, प्रकाश आंबेडकर यांनी जरांगेंची अंतरवाली सराटी येथे जाऊन भेट घेतली. त्यामुळे राजकारणातील चर्चेला उधाण आलं. मात्र या बैठकीत प्रकाश आंबेडकर आणि जरांगे यांच्यात काय चर्चा झाली? असा प्रश्न अनेकांना पडला आहे. दरम्यान लोकसभा निवडणुकीवर जरांगेंनी महत्त्वाची माहिती दिली आहे.

काय म्हणाले जरांगे?

वंचित बहूजन आघाडीचे पक्ष प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी अंतरवाली सराटी येथे जाऊन रात्री जरांगेंची (Manoj Jarange) भेट घेतली. यावेळी मराठा आरक्षणाच्या आंदोलनाची पुढील दिशा, लोकसभा निवडणुकीबाबत दिड तास चर्चा झाली. त्यानंतर माध्यमांशी बोलत असताना जरांगेंनी खुलासा करत म्हटलं की, राजकारणावर माझा विश्वास नाही. मी माझ्या समाजाला विचारुन पुढील निर्णय घेईल.

समाजाने नाही म्हटलं तर नाही आणि समाज हो म्हटला तर हो असं जरांगे म्हणाले. मी इतक्या ताकतीने राजकारणात उतरेल की, त्यांनी मला आंदोलनात जितकं हलक्यात घेतलं होतं तसं राजकारणात हलक्यात घ्यायचं नाही, असं जरांगेंनी म्हटलंय.

30 तारखेला चित्र स्पष्ट करु-

पुढे जरांगे (Manoj Jarange) म्हणाले की, जरी वंचितकडून मला प्रसताव आला असला तरी सुद्धा मी माझे सर्व सुत्र समाजाच्या हाती देणार आहे. गावागावातील बैठकीचे निर्णय कळतील. येत्या 30 तारखेला समाजाच्या म्हणण्यानसूसार सर्व चित्र स्पष्ट होईल. गावागावतून अपक्ष उमेदवार देण्याबाबत निर्णय घेऊ. माझा जन चळवळीवर विश्वास आहे, असं देखील जरांगे म्हणाले.

प्रकाश आंबेडकर काय म्हणाले?

माध्यमांशी बोलत असताना प्रकाश आंबेडकर म्हणाले की, काल (26 मार्च) रात्री मी मनोज जरांगे पाटील यांना भेटलो. विस्ताराने बोलणं झालं. त्यात ओबीसीसोबत आघाडीचा निर्णय घेतला गेला. मुस्लिम, जैन समाजाला उमेदवारी देण्याचा निर्णय झाला. जास्तीत जास्त उमेदवार गरीब वर्गातील असतील. पहिल्या टप्प्यातील उमेदवारांना जरांगेंचं समर्थन असेल. ते त्यांची अंतिम भूमिका 30 तारखेला घेतील.

News Title : manoj jarange on loksabha election 2024

महत्त्वाच्या बातम्या-

मुरलीधर मोहोळ, रवींद्र धंगेकर अन् वसंत मोरे दिसले एकत्र, ‘त्या’ फोटोमुळे चर्चांना उधाण

“नुसत्याच निष्ठेच्या बाता…,”; रूपाली पाटील ठोंबरेंचा अमोल कोल्हेंना टोला

सुनेत्रा पवारांची अजित पवारांसाठी खास पोस्ट, म्हणाल्या…

सिनेमात काम करणार?; अमित ठाकरेंनी अखेर सांगूनच टाकलं

“जनतेच्या मनातील मोदी कसे पुसणार?”, रक्षा खडसेंचा नणंद रोहिणी खडसेंना टोला

Mrudula Jog

Mrudula Jog

Join WhatsApp Group

Join Now