Manoj Jarange | मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या महाराष्ट्रात जाहीर सभा सुरु आहेत. मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी जरांगे पाटील राज्यभर सभा घेत आहेत. 35 उपोषणानंतर जरांगे पाटील यांनी अनेक राज्यात सभा घेतली आहे. त्यांच्या सभेला मराठा बांधव देखील पाठिंबा देत आहे.
(Manoj Jarange) जरांगे पाटील यांच्या प्रकृतीबाबत एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. बीड येथे जरांगे पाटील यांनी सभा घेतली यावेळी त्यांच्या प्रकृती अचानक खालावली. त्यामुळे त्यांना तातडीने जवळच्या रुग्णलयात जरांगे पाटलांना उपचारासाठी हलवण्यात आलं होतं. जरांगे पाटील यांच्या प्रकृतीबाबत डाॅक्टरांनी महत्त्वाची माहिती दिलीये.
Manoj Jarange यांना डाॅक्टर काय म्हणाले?
बीड येथे आज जरांगे पाटील यांची सभा पार पडली. बीड जिल्ह्यातील अंबासाखर कारखाना येथे मनोज जरांगे पाटील यांची पहिल्यांदा सभा झाली. या सभेला मराठा बांधवानी तूफान गर्दी केली होती.
या सभेपूर्वीच्या एका सभेला संबोधित करत असताना मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती बिघडली होती. त्यामुळे ते स्टेजवरतीच बसले होते. त्यांना थकवा वाटत होता. अशक्तपणा जाणवत होता. त्यामुळे त्यांनी अर्ध्यातच भाषण थांबवलं. त्यानंतर जरांगे पाटील थोडावेळ जागेवर बसले होते.
डाॅक्टरांनी जरांगेंना काय सल्ला दिला?
दरम्यान, डॉक्टरांनी येऊन जरांगे पाटील यांची प्रकृती तपासली. शिवाय त्यांना तीन महिने आराम करण्याचा सल्लाही दिला. पण जरांगे पाटील यांनी हा सल्ला ऐकला नाही. बीड येथे सभा पार पडल्यानंतर जरांगे पाटील यांना असवस्थ वाटू लागलं.
जरांगे पाटील यांच्या सभेचा चौथा टप्पा सुरु आहे. बीडमध्ये सभा आटोपून निघत असताना जरांगे पाटील यांची तब्येत खालावली, त्यामुळे जरांगेंना आंबेजोगाई येथे हलवण्यात आलं आहे.
News Title : manoj jarange health news
थोडक्यात बातम्या –
Rashmika Mandanna | नॅशनल क्रश रश्मिकाचा नवा व्हिडीओ व्हायरल
Neena Gupta | ‘माझा एक्स बॉयफ्रेंड फुकटा होता, तो माझ्याकडे…’; नीना गुप्तांचा खुलासा
BMC | शिंदे सरकारची मोठी खेळी; ठाकरे कुटुंब अडचणीत येणार?
Gold Price Today | मोठी गुड न्यूज! सोनं झालं स्वस्त, जाणून घ्या दर






