Manoj Jarange | ‘ते व्हायला नको होतं…’; मनोज जरांगेंचं मोठं वक्तव्य

On: January 31, 2024 4:57 PM
Manoj Jarange
---Advertisement---

Manoj Jarange | कुणबी असणाऱ्याच्या 57 लाख नोंदी सापडल्या आहेत. नोंदी जुन्या आहेत पण नव्याने सापडल्या आहेत. माझी म्हातारा माणूस म्हणून त्यांना विनंती आहे. आम्हाला चॅलेंज देऊ नये. आम्हाला मंडल कमिशनचं वाटोळं करायचं नाही. सभा घेऊन राजकीय पोळी भाजत आहेत. त्यांनी स्वतः वरच्या 3 केस मागे घेतल्या ओबीसी बांधवांनी सांगावं की शांत राहा. याला समजवून सांगा आम्ही सगळ्याला विनंती करणार आहोत, असं म्हणत जरांगेंनी भुजबळांवर पुन्हा एकदा निशाणा साधलाय.

मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange) यांनी आज पुण्यात पत्रकार परिषद घेतली. यावेळी मराठा आरक्षणासह (Maratha Reservation) अन्य मुद्द्यांवर भाष्य केलं.यावेळी बोलताना जरांगेंनी अंतरवलीत झालेल्या लाठीचार्जवरही भाष्य केलंय.

ते व्हायला नको होतं- मनोज जरांगे

अंतरवलीत लाठीचार्ज झाला. तेव्हा आम्हाला खूप मारलं. तो लाठीचार्ज हा एक डाग आहे. इतकं निर्दयी सरकार मी कधीच बघितलं नव्हतं. त्यावेळी 400 पोलीस आमच्यात घुसले. माईकच्या वायर तोडण्यात आल्या. सगळं अचानक सुरू झालं. ते व्हायला नको होतं, असं मनोज जरांगे (Manoj Jarange) यांनी म्हटलं.

Manoj Jarange | “तो लाठीचार्ज हा एक डाग आहे”

आमचा लढा अंतिम टप्प्यात आहे. नातेवाईकांना प्रमाणपत्र वाटा ही आमची मागणी होती. जे लोक सगे सोयरे आहेत. त्यांना देखील प्रमाणपत्र द्यावं अशी मागणी होती. सरकारने मुंबईच्या वेशीवर राजपत्र दिलं, असं मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange) म्हणाले.

माझ्या मराठा समाजाने मला स्वीकारलं. मला नेतृत्व करायचं नव्हतं. पण आंदोलन करायचं होतं आणि प्रामाणिक पणे करायचं होतं. मला दुकानदारी करायची नव्हती. मी एका शेतकऱ्यांचं पोरगं आहे. मला कुठलीही पार्श्वभूमी नाही, असं मनोज जरांगे म्हणालेत.

आमच्या समाजाचा हा प्रचंड मोठा विजय आहे. आम्ही दिवाळी साजरी केली आता महादिवाळी साजरी करू… पाहिलं प्रमाणपत्र वाटलं की सगळ्यात मोठी सभा घेणार आहोत, असंही त्यांनी सांगितलंय.

महत्त्वाच्या बातम्या- 

Maratha resevation | भुजबळांनंतर ‘हा’ बडा नेता मराठा आरक्षणाविरोधात आक्रमक; आखला मोठा प्लॅन

‘ते थोडीच मागास आहेत?’; Manoj Jarange यांनी पुष्कर जोगला सुनावलं

Budget 2024 | बजेटआधी सरकारने दिली मोठी गुड न्यूज!

‘No Entry 2’ मधून सलमान खानलाच मिळाला डच्चू; नवीन कास्टची नावे ऐकून चाहत्यांना धक्का

Rahul Gandhi | बिहारमध्ये न्याय यात्रेत मोठी दुर्घटना, राहुल गांधी थोडक्यात बचावले

Babita Durande

Babita Durande

Join WhatsApp Group

Join Now