मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थकावर दगडफेक!

On: April 16, 2024 11:34 AM
Manoj Jarange Patil
---Advertisement---

Manoj Jarange | मराठा आरक्षणाचे समर्थक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange) हे अनेक महिन्यांपासून मराठा समाजासाठी लढत आहेत. आंदोलन करत आहेत. जरांगे पाटील (Manoj Jarange) यांच्या समर्थकासोबत धक्कादाय़क प्रकार घडला आहे. जरांगे पाटील (Manoj Jarange) यांचे समर्थक अमोल खुणे यांच्यावर दगडफेक करण्यात आली असून हल्ला करण्यात आला. त्यांच्या डोक्यावर जबर दुखापत झाली. त्यांना तातडीने उपचारासाठी गेवराईच्या उपजिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आलं. खुणे यांच्यावर हल्ला केल्यानंतर आरोपी तातडीने तिथून निघून गेले.

जरांगे पाटील यांच्या समर्थकावर दगडफेक

गेवराई उपजिल्हा रूग्णालयात दाखल केल्यानंतर खुणे रूग्णायलयाबाहेर अनेकांची गर्दी झाली. मिळालेल्या महितीनुसार, अमोल खुणे हे धानोरा गावाचे रहिवासी आहेत. ते मनोज जरांगे पाटील यांचे कट्टर समर्थक आहेत. कोपर्डीच्या आत्याचारात सामिल असणाऱ्या आरोपींवर अमोल खुणे यांनी हल्ला केला. त्यामुळे त्यांना दोन वर्षे तुरूंगात जावं लागलं आहे. तुरूंगातून बाहेर आल्यानंतर ते पुन्हा मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange) यांच्यासोबत काम करू लागले.

अमोल खुणे घरी जात असताना हल्ला

सोमवारी रात्री अमोल खुणे हे गेवराईतून धानोरा य़ेथे गेले जात असताना त्यांच्यावर दगड हल्ला झाला. रस्त्यात दबा धरून बसलेल्यांनी त्यांच्यावर दगडफेक केली. त्यामुळे अमोल खुणे गंभीर जखमी झाले. त्यांच्या डोक्यावर जबर मार लागला.

खुणे यांच्यावर दगडफेक झाल्यानंतर ते जबर जखमी झाले आणि स्थानिक रहिवाशी त्यांच्या मदतीसाठी पुढे धावून आले. गेवराई उपचारासाठी त्यांना तातडीने रूग्णालयात दाखल केलं. अमोल खुणे यांचा मराठा आरक्षणाच्या आंदोलनामध्ये सक्रिय सहभाग असतो.

मराठा आरक्षणावरूनच अमोल खुणे यांच्यावर हल्ला करण्याचा दावा मराठा आंदोलकांनी केलाय. त्यानंतर हल्लेखोर गेले असून त्यांचा कसून सोध घेणे सुरू आहे.

News Title – Manoj Jarange colleague Amol Khune Injured After Some Men’s Attack

महत्त्वाच्या बातम्या

चंदा दो धंदा लो; या खेळाचे सूत्रधार मिंधेसरकारचे बाळराजे! संजय राऊत भ्रष्टाचारावरून कडाडले

तो आला, त्याने RCB च्या गोलंदाजांना धु धु धुतले; झळकावले सर्वात जलद शतक

मोठी बातमी! अखेर सलमान खान गोळीबार प्रकरणातील दोन्ही आरोपींना गुजरातमधून अटक

या राशीच्या व्यक्ती प्रेमप्रकरणात यशस्वी होतील

“अजूनपण सांगतो नारळ द्या….,” मुंबई इंडियन्सच्या पराभवानंतर अभिनेत्याची पोस्ट व्हायरल

Join WhatsApp Group

Join Now