ऐश्वर्या राय आणि सुष्मिता सेनबाबत प्रसिद्ध अभिनेत्रीचा मोठा खुलासा!

On: April 30, 2024 1:51 PM
Maninee De
---Advertisement---

Maninee De | बॉलिवूडच्या दोन दिग्गज अभिनेत्री ऐश्वर्या राय आणि सुष्मिता सेनच्या करिअरची सुरूवात ही 1994 मध्ये झाली. त्या मिस इंडिया स्पर्धेत समोरासमोर आल्या होत्या. तेव्हा सुष्मिता सेन आणि ऐश्वर्या राय हे एकमेकांसोबत काहीही बोलल्या नसल्याच्या तेव्हा चर्चा होत्या. त्या आजही होताना दिसत आहेत. यावर अभिनेत्री ‘मनिनी डे’नं (Maninee De) नुकतीच एक मुलाखत दिली. त्यामध्ये तिनं सुष्मिता आणि ऐश्वर्याबाबत माहिती नसलेल्या गोष्टींचा खुलासा केला आहे.

एका मुलाखतीत बोलत असताना ती म्हणाली की, मी माझ्या यशाचं क्रेडिट हे सुष्मिता सेन यांना देणार आहे. कारण त्यांनी मला सांगितलं की तु दिसायला सुंदर आहेस. तु देखील यामध्ये भाग घेऊ शकतेस. तेव्हा मी स्पर्धेच्या अंतिम तारखेला माझा अर्ज दाखल केला आणि त्या स्पर्धेमध्ये भाग घेतला. (Maninee De)

ऐश्वर्याने दिलं मनिनीला वोट, किस्सा सांगताना म्हणाली..

मनिनीने मुलाखतीत बोलत असताना ऐश्वर्याने मनिनीला वोट दिले होते त्याचा किस्सा सांगितला. ती म्हणाली की, आम्ही गोव्याला फिरायला जायचो. मौज मजा करायला जायचो. मात्र आम्ही गोव्याला गेल्यानंतर तिथं मी पहिल्यांदा ऐशवर्याला पाहिलं होतं. ती केवळ सुंदर नाहीतर दयाळू पण आहे, असं मनिनी (Maninee De) म्हणाली.

तेव्हा ऐश्वर्याने मनिनीला (Maninee De) वोट केलं होत तो किस्सा मनिनीने सांगितला, मनिनी म्हणाली, मी ‘मिस कंजेनियलिटी’ स्पर्धा विजयी झाले होते. तेव्हा ऐश्वर्या राय माझ्याजवळ आली आणि म्हणली की मी तुला वोट केलं आहे आणि तु खरंच खूप सुंदर आहेस, असा किस्सी मनिनीने सांगितला.

सुष्मता आणि ऐश्वर्यामध्ये वाद होता?

मिस इंडिया स्पर्धेत ऐश्वर्या आणि सुष्मिता सेन यांच्यावर वाद झाल्याच्या अफवा होत्या. याबाबत मुलाखतीत मनिनीला विचारलं असता तिनं उत्तर दिलं आहे. मनिनी म्हणाली की, असं त्यावेळी काहीही नव्हतं. त्या मिस इंडिया स्पर्धेत एकमेकिंशी बोलत होत्या.

दरम्यान सध्या अभिनेत्री आणि मिस इंडिया ऐश्वर्या राय ही बच्चन घराण्याची सून आहे. 2007 मध्ये तिनं अभिनेता अभिषेक बच्चनसोबत विवाह केला होता. त्यांना आराध्या नावाची एक मुलगी आहे. ती सध्या फिल्म इंडस्ट्रिपासून लांब राहत असून गेल्या काही दिवसांपासून अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय यांच्या घटस्फोटाची चर्चा आहे.

तसेच अभिनेत्री सुष्मिता सेन ही नेहमी आपल्या कामानिमित्त चर्चेत असते. तिनं विवाह केला नाही पण तिला दोन मुली आहेत. ज्या सुष्मिताने वयाच्या 24 व्या वर्षी दत्तक घेतल्या आहेत. नुकतीत तिची ‘ताली’ नावाची तृतीयपंथीयांवर अधारित एक सीरिज ओटीटी प्लॅटफॉर्मवर आहे. प्रेक्षक या सीरिजला प्रचंड पसंती देताना दिसत आहेत.

News Title – Maninee De Talk About Aishwarya rai And Sushmita Sen

महत्त्वाच्या बातम्या

गुंतवणूकदारांना सुवर्णसंधी!; टाटा कंपनीच्या ‘या’ समूहाचा IPO येणार

‘त्या नेत्याने 45 वर्षांपूर्वी हा खेळ…’; मोदींची शरद पवारांवर घणाघाती टीका

रोहित पवारांचा अत्यंत धक्कादायक दावा, फडणवीसांवर केला गंभीर आरोप

“30 वर्षात एखाद्या गावात साधा रस्ताही गीतेंनी केला नाही”, तटकरेंचं गीतेंना प्रत्युत्तर

UGC NET परीक्षेची तारीख बदलली; आता परीक्षा ‘या’ दिवशी होणार

 

Join WhatsApp Group

Join Now