“… तर मी थेट राजीनामा देईन”; माणिकराव कोकाटेंच रमी प्रकरणावर स्पष्टीकरण

On: July 22, 2025 11:32 AM
Manikrao Kokate
---Advertisement---

Manikrao Kokate | विधिमंडळात मोबाईलवर रमी खेळल्याचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर अडचणीत सापडलेल्या कृषीमंत्री माणिकराव कोकाटे (Manikrao Kokate) यांनी अखेर पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट केली आहे. त्यांनी स्पष्ट शब्दांत सांगितलं की, “मला रमी खेळताच येत नाही. दोषी ठरलो, तर थेट राज्यपालांकडे राजीनामा देईन.”

राष्ट्रवादी (शरद पवार गट) चे आमदार रोहित पवार (rohit pawar यांनी कोकाटेंचा व्हिडीओ ट्विट करत त्यांच्यावर निशाणा साधला होता. त्यानंतर विरोधकांनी कोकाटेंच्या राजीनाम्याची जोरदार मागणी केली होती. मात्र, कोकाटे यांनी आज पत्रकार परिषदेत हा संपूर्ण प्रकरण “बिनबुडाचा” असल्याचा दावा केला.

“तो मोबाईल नवीन होता; गेम स्कीप करताना वेळ गेला” :

माणिकराव कोकाटे (Manikrao Kokate) यांनी स्पष्ट केलं की, “सदर मोबाईल माझ्यासाठी नवीन होता. मी सभागृहात असल्याने माझ्या OSD कडून माहिती घेण्यासाठी मोबाईल मागवला होता. मोबाईल उघडताच त्यावर पॉप-अप स्वरूपात रमीसारखा गेम दिसला.”

“तो गेम स्कीप करायचा प्रयत्न केला, पण गेम काही सेकंद स्कीप होत नाही. व्हिडीओ केवळ ११ सेकंदाचा आहे. पण संपूर्ण व्हिडीओ दाखवला असता, मी रमी खेळत नव्हतो हे स्पष्ट झालं असतं,” असंही त्यांनी नमूद केलं.

Manikrao Kokate | “ऑनलाईन रमीसाठी बँक अकाउंट लिंक लागतं, माझं काहीच जोडलेलं नाही” :

“ऑनलाईन रमी अ‍ॅप वापरण्यासाठी मोबाईल नंबर व बँक खाते लिंक करावं लागतं. माझं कोणतंच खाते अशा अ‍ॅपशी जोडलेलं नाही. मी आजवर एक रुपयाची देखील रमी खेळलेली नाही. मला रमी कशी खेळायची हेही माहीत नाही,” असं ठाम विधान त्यांनी केलं.

तसंच, “मी दोषी ठरलो, तर मुख्यमंत्री किंवा उपमुख्यमंत्री यांचं निवेदन पुरेसं असेल. त्याआधीच मी स्वतःहून राज्यपालांकडे जाऊन राजीनामा देईन,” अशी थेट घोषणा त्यांनी केली. (Manikrao Kokate Rummy)

“माझी बदनामी झाली; आरोप करणाऱ्यांना कोर्टात खेचणार” :

कोकाटे म्हणाले, “ज्या नेत्यांनी राजकीय हेतूनं माझी बदनामी केली, त्यांना मी कोर्टात खेचणार आहे. कुठल्याही चौकशीस मी तयार आहे. माझ्याविरोधातील आरोपांत कोणतंही तथ्य नाही.”

“हा छोटा विषय असून, त्याचं राजकारण केलं जात आहे. माझ्या बदनामीसाठी जाणीवपूर्वक हा विषय ताणला गेला,” असा आरोपही त्यांनी केला.

News Title: Manikrao Kokate Responds to Rummy Game Row: “I Don’t Know How to Play It. If Guilty, I’ll Resign.”

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now