माणिकराव कोकाटेंची तब्येत खालावली; आता थेट अँजिओग्राफी होणार?

On: December 19, 2025 11:43 AM
Manikrao Kokate Case
---Advertisement---

Manikrao Kokate | नाशिकच्या सदनिका घोटाळा प्रकरणात दोषी ठरलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते माणिकराव कोकाटे सध्या मुंबईतील लीलावती रुग्णालयात (Lilavati Hospital) उपचार घेत आहेत. नाशिक सत्र न्यायालयाचा निकाल आल्यानंतर कोकाटेंचा रक्तदाब अचानक वाढल्याने त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. सध्या ते अतिदक्षता विभागात असून डॉक्टरांकडून त्यांच्यावर विशेष उपचार सुरू आहेत.

दरम्यान, माणिकराव कोकाटे (Manikrao Kokate) यांच्या प्रकृतीबाबत एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे. उच्च रक्तदाब नियंत्रणात येत नसल्याने त्यांना पुढील काही दिवस विश्रांतीची आवश्यकता असल्याचे डॉक्टरांनी नाशिक पोलिसांना कळवले आहे. त्यामुळे कोकाटेंच्या प्रकृतीवर डॉक्टरांचे बारकाईने लक्ष असल्याचे सांगण्यात येत आहे.

डॉक्टरांचा सल्ला महत्त्वाचा; अँजिओग्राफीचा निर्णय आज होणार? :

डॉक्टरांच्या प्राथमिक अहवालानुसार माणिकराव कोकाटे यांचा उच्च रक्तदाब अद्याप स्थिर झालेला नाही. त्यामुळे पुढील वैद्यकीय तपासणी आणि निरीक्षण गरजेचे असल्याचे मत तज्ज्ञ डॉक्टरांनी व्यक्त केले आहे. याच पार्श्वभूमीवर आज सकाळी त्यांची अँजिओग्राफी केली जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. (Manikrao Kokate Angiography News)

अँजिओग्राफीच्या अहवालानंतरच कोकाटेंना डिस्चार्ज (Manikrao Kokate Health Update) द्यायचा की नाही, याचा निर्णय घेतला जाणार आहे. तसेच वैद्यकीय अहवालानंतरच पोलिस पुढील कायदेशीर कारवाईबाबत निर्णय घेणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. त्यामुळे सध्या तरी अटकेची कारवाई तात्काळ होण्याची शक्यता कमी असल्याचे बोलले जात आहे.

Manikrao Kokate | नाशिक पोलिसांची भूमिका काय? :

नाशिक पोलिसांच्या माहितीनुसार, लीलावती रुग्णालयातील रात्रपाळीचे इंचार्ज डॉक्टर कुलदीप देवरे यांचा जबाब नोंदवण्यात आला आहे. रुग्णालय प्रशासनाकडून आतापर्यंत करण्यात आलेल्या उपचारांची सविस्तर माहिती पोलिसांनी घेतली असून पुढील उपचारांबाबत लेखी अहवाल मागवण्यात आला आहे.

न्यायालयाच्या आदेशांचे पालन करत असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले असून, पुढील वैद्यकीय अहवाल प्राप्त होईपर्यंत थांबणे क्रमप्राप्त असल्याचे सांगण्यात आले आहे. नाशिकहून आलेल्या पोलिस पथकात महिला पोलिस नसल्याने वांद्रे पोलिसांची मदत घेण्यात आली आहे. रुग्णालय प्रशासनानेही न्यायालयाच्या आदेशांचे पालन करण्याचे आश्वासन दिल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

News Title: Manikrao Kokate Health Update: Condition Worsens After Nashik Police Reach Lilavati Hospital, Angiography Likely Today

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now