गुढीपाडव्याला बनवा स्वादिष्ट आम्रखंड, जाणून घ्या खास रेसिपी

On: April 7, 2024 11:13 AM
Mango Shrikhand Recipe for Gudi Padwa 2024
---Advertisement---

Mango Shrikhand Recipe | भारतीय संस्कृतीमध्ये ‘चैत्र शुद्ध प्रतिपदा’ हा दिवस ‘महापर्व’ म्हणून साजरा करण्याची परंपरा आहे. महापर्वाच्या अर्थात नववर्षाच्या या पहिल्या दिवशी नवे संकल्प करून प्रगतीकडे वाटचाल सुरू करण्याचा हा दिवस ‘गुढीपाडवा’ म्हणून साजरा केला जातो.या दिवशी विजयाचे प्रतिक म्हणून घराच्या अंगणात गुढी उभारली जाते. यासोबतच बरेच जण या सणाला जेवणात आम्रखंडचा देखील बेत आखतात.

या दिवशी आवर्जून विविध प्रकारचे पदार्थ बनवले जातात. त्यात श्रीखंड, पुरणपोळी, खीर, आंबरस असे पदार्थ घरोघरी बनवले जातात. सध्या आंब्याचा हंगाम सुरु झाला आहे. तर या गुढीपाडव्याला तुम्ही घरीच अगदी स्वादिष्ट असे आम्रखंड बनवू शकता. या लेखात तुम्हाला याची संपूर्ण रेसिपी दिली आहे.

आम्रखंड बनवण्याची रेसिपी

साहित्य : ताजे दही 2 किंवा 1/2 कप (500 ग्रॅम), पिठीसाखर 1/4 कप, आंब्याचा पल्प 1 कप, काजू किंवा बदाम 4, पिस्ता 5-6, वेलची 2 इतके साहित्य तुम्हाला आम्रखंड बनवण्यासाठी लागेल.

कृती : सर्वप्रथम सगळे ड्राय फ्रूटसचे बारीक तुकडे करून घ्या. एका जाड कपड्यात ठेवा दही बांधून लटकवा.दह्यातील सर्व पाणी निघून जाईल आणि दही घट्ट होईल, मग ते कपड्यातून काढून एका भांड्यात ओता. या दह्यात पिठीसाखर, आंब्याचा लगदा, बदाम, पिस्ते आणि काजू आणि वेलची घालून चांगले मिक्स करा.वरती थोडे आंब्याचे तुकडे छोट्या आणि ड्राय फ्रूटस टाकून सजवा.तुमचे चविष्ट (Mango Shrikhand Recipe) आम्रखंड घरीच तयार आहे. तुम्ही गरमगरम पुरीसोबत याचा आस्वाद घेऊ शकता.

श्रीखंड खाण्याचे फायदे

उन्हाळ्यात श्रीखंड खाण्याचा सर्वात मोठा फायदा म्हणजे उन्हाळ्यापूर्वी पोट थंड होते. श्रीखंड खाल्ल्याने आतड्यांतील बॅक्टेरिया वाढण्यास मदत होते, ज्यामुळे पचनसंस्था निरोगी राहण्यास मदत होते. शरीराचे तापमान संतुलित राखण्यासाठी आणि आतड्यांचे कार्य गतिमान करण्यासाठी देखील ते फायदेशीर आहे.

तुम्हीही गुढी पाडव्याला या रेसिपीचा आधार घेऊन स्वादिष्ट आम्रखंड (Mango Shrikhand Recipe) घरीच बनवू शकता. हा एक प्रकारचा प्रोबायोटिक अन्न पदार्थ आहे. सणा-सुदीला हा पदार्थ आवर्जून बनवला जातो. मार्केटमध्ये देखील अनेक फ्लेवरचे श्रीखंड उपलब्ध आहेत.

News Title : Mango Shrikhand Recipe for Gudi Padwa 2024

महत्त्वाच्या बातम्या-

IDFC फर्स्ट बँकेला आरबीआयने ठोठावला दंड; ग्राहकांवर काय परिणाम होईल?

पैसे मोजताना ‘ही’ चूक करत असाल तर थांबा, अन्यथा…

‘रामायण’मध्ये दिसणार ‘हे’ कलाकार?; फोटो सोशल मीडियावर व्हायरल

लग्न कधी करणार?; पूजा भट्टने अखेर उत्तर दिलं

शरद पवार गटाचा ‘हा’ उमेदवार संकटात; उमदेवारी जाहीर होताच मोठी कारवाई

Join WhatsApp Group

Join Now