प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीचा घटस्फोट! व्हिडीओ शेअर करत म्हणाली, मला आनंद होत आहे!

On: February 26, 2024 7:01 PM
---Advertisement---

Manasi Naik | प्रसिद्ध मराठी अभिनेत्री मानसी नाईक गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आली होती. मानसी नाईक तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेचा विषय बनली होती. तीन वर्षांपूर्वी मानसी नाईकने बाॅडी बिल्डर प्रदिप खरेरासोबत लग्नगाठ बांधली होती. मात्र, या दोघांच्या नात्यामध्ये दुरावा निर्माण झाल्यामुळे या दोघांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला. आपल्या अधिकृत YouTube अकाउंटवरुन मानसीने एक व्हिडीओ शेअर करत याबदल खुलासा केला आहे.

घटस्फोटाबद्दल दिली माहिती-

मराठी अभिनेत्री मानसी नाईक  (Manasi Naik) सोशल मीडियावर कायम सक्रीय असते. दरम्यान, आपल्या चाहत्यांसाठी मानसीने एक व्हिडीओ शेअर करत तिच्या घटस्फोटाची माहिती दिली. व्हिडीओ शेअर करत मानसी म्हणाली की, “अखेर माझ्या आयुष्यात आलेले अडथळे दूर झाले आहेत आणि आता नव्या जोमाने, नव्या रुपात मी माझ्या आयुष्याची सुरुवात केली आहे.

Embracing new beginnings with open arms! ???? Finally divorced and feeling liberated! #ManasiNaik

कोणत्याच कलाकाराचं आयुष्य हे प्रायव्हेट नसतं. ते पब्लिकच असतं. माझा चाहतावर्ग खूप भावनिक आहे. याचा मी जवळून अनुभव घेतला आहे. माझ्या नव्या प्रवासाची आता खरयांने सुरुवात झाली आहे, असं मानसी म्हणाली.

अखेर माझा घटस्फोट झाला-

पुढे ती (Manasi Naik) म्हणाली की, एक स्त्री म्हणून मी सांगेल की, जर या जगात जगायचं असेल तर तुम्हाला काही गोष्टी एकदम स्पष्टपणे बोलायला हव्या आहेत, असं मला वाटतं. लाज वाटेल असं मी कधीच काही करत नाही. “तुम्हाला सांगताना मला आनंद होत आहे, की अखेर माझा घटस्फोट झाला आहे. अधिकृतरित्या आता मी मानसी नाईक आहे. मी हरले नाही तर जिद्दीने समाजात वावरायला आता सज्ज आहे. कलाकार म्हणून आमच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोण सामान्यांपेक्षा वेगळा असतो. त्यामुळे गोष्टी लपवला येत नाही. चुका आमच्याकडूनही होतात. आता आनंदाने नवा प्रवास सुरू करायला मी सज्ज झाली आहे”.

आयुष्य खूप सुंदर आहे-

सोशल मीडियावर देखील मानसीची जबरदस्त फॅन फाॅलोइंग आहे. सोशल मीडियावर बोलत असताना मानसी म्हणाली की,” आयुष्यात कधीच हार मानू नका. आयुष्य खूप सुंदर आहे. कोणताही अन्याय सहन करायचा नाही. चुकीचे निर्णय घेऊन आयुष्य खराब करायचं नाही. आई-वडील आपल्याकडे विश्वासाने पाहत असतात. प्रत्येक दिवस हा नवीन असतो.

News Title : manasi naik reavles about her divorce

महत्त्वाच्या बातम्या-

मनोज जरांगे पाटील माघारी फिरले, मराठा बांधवांना केलं महत्त्वाचं आवाहन

“सागर बंगल्याबाहेरील मोठी भिंत पार करा…”; नितेश राणेंचं जरांगेंना आव्हान

सदावर्तेंनी शरद पवारांचं नाव घेत केली ‘ही’ मोठी मागणी

‘खुमखुमी असेल तर फडणवीस यांनी…’; जरांगे भडकले

आदित्य ठाकरेंकडून एकनाथ शिंदेंना चॅलेंज, म्हणाले…

Mrudula Jog

Mrudula Jog

Join WhatsApp Group

Join Now