Mamta Kulkarni | 1990 च्या दशकात ममता कुलकर्णीने (Mamta Kulkarni) चित्रपटांमध्ये पदार्पण करून त्वरित प्रसिद्धी मिळवली. कालांतराने तिने अध्यात्माचा मार्ग स्वीकारला, तरीही वाद तिच्याभोवती कायम राहिले.
महाकुंभ 2025 दरम्यान, किन्नर आखाड्याने कुलकर्णीला महामंडलेश्वराची पदवी दिली. परंतु, अनेक हिंदू साधूंच्या विरोधानंतर अवघ्या सात दिवसांत तिला या पदावरून दूर करण्यात आले.
मुलाखतीत ममता कुलकर्णीने उघड केले गुपित-
नकत्याच एका मुलाखतीत बोलताना ममता कुलकर्णीने (Mamta Kulkarni) सांगितले की, ती गेल्या 23 वर्षांपासून कोणतेही प्रौढ चित्रपट (adult films) पाहिलेले नाहीत. तिने साध्वी बनण्याचा प्रवास उलगडला. अभिनेत्रीने नवरात्रीदरम्यान ताज हॉटेलमध्ये “2 पेग” घेतल्याचा किस्साही सांगितला.
जेव्हा तिला विचारण्यात आले की, नवरात्रीदरम्यान उपवास करताना रात्री ताजमध्ये जाऊन दोन पेग स्कॉच घेतल्याच्या बातम्या खऱ्या आहेत का? तेव्हा ममता कुलकर्णी म्हणाली, “जेव्हा मी बॉलिवूडमध्ये होते, तेव्हा 1997 मध्ये माझ्या गुरूंचे माझ्या आयुष्यात आगमन झाले.”
नवरात्रीतील उपवास आणि ‘तो’ प्रसंग
नंतर मुलाखत घेणाऱ्याने विशेषतः त्या बातम्यांचा उल्लेख केला, ज्यामध्ये कुलकर्णी नवरात्रीदरम्यान ध्यान आणि उपवास करत असे, पण रात्री ताजमध्ये जाऊन दोन पेग स्कॉच घेत असे.
यावर ममता कुलकर्णी (Mamta Kulkarni) म्हणाली, “बॉलिवूडमध्ये असताना माझे आयुष्य एका कठोर दिनचर्येत बांधलेले होते. जेव्हा मी शूटिंगसाठी जायचे, तेव्हा मी तीन बॅग घेऊन जायचे. एकात माझे कपडे असायचे, तर दुसऱ्यात माझे छोटेसे मंदिर असायचे. हे मंदिर माझ्या खोलीतील टेबलावर मांडून मी कामाला जाण्यापूर्वी पूजा करायचे. ही पूजा पूर्ण केल्यावरच मी माझ्या शूटिंगला सुरुवात करायचे.”
तिने पुढे सांगितले, “मी नवरात्रीचे व्रत करायचे. ही नवरात्री नऊ दिवसांची सिद्धी असते. मी उपवास करण्याचा आणि सकाळी, दुपारी आणि संध्याकाळी तीन हवन करण्याचा संकल्प केला होता. नऊ दिवस मी फक्त पाण्यावर होते. मी 36 किलो चंदनाचा वापर करून यज्ञ केला.”
जेव्हा डिझायनरने म्हटले, ‘बस कर ममता!’
“माझ्या डिझायनरने, जी त्यावेळी बॉलिवूडमधून होती, मला म्हटले, ‘ममता, तू हे काय करत आहेस? तू खूप गंभीर झाली आहेस. ऊठ, नऊ दिवस पुरे झाले, चल आता.’ त्यानंतर आम्ही ताजमध्ये गेलो. अशा प्रकारे एक-दोन नवरात्री गेल्या. मी स्कॉच प्यायचे, पण दोन पेगनंतर मला लगेच वॉशरूममध्ये जावे लागले. असे वाटायचे की जणू सर्व दारू एका क्षणात माझ्या डोक्यात गेली आहे.
नऊ दिवसांची तपश्चर्या आणि उपवास यामुळे माझ्या शरीरावर परिणाम होत होता. माझी आतडी जळत असल्यासारखे वाटत होते. मी 40 मिनिटे वॉशरूममध्ये बसून राहिले,” असे कुलकर्णीने सांगितले.
माजी अभिनेत्री पुढे म्हणाली, “पाहा, हे सर्व 1996-97 मध्ये घडले. दोन वर्षे माझ्या गुरूंनी पाहिले की बॉलिवूड मला या मार्गावर जास्त काळ राहू देणार नाही. म्हणूनच त्यांनी माझ्यासाठी तपश्चर्येचे ठिकाण निवडले जिथे मला 12 वर्षे कोणीही भेटणार नाही.”
वाद आणि पदमुक्ती-
ममता कुलकर्णीला महामंडलेश्वर पदावरून काढून टाकण्याचे कारण म्हणजे किन्नर आखाड्याचे संस्थापक अजय दास आणि आचार्य महामंडलेश्वर लक्ष्मी नारायण त्रिपाठी यांच्यातील वाद. कुलकर्णीच्या पदावरून आखाड्यात फूट पडली होती.
हा वाद वाढत गेला, ज्यामुळे आखाड्यात आणखी वाद निर्माण झाले आणि शेवटी त्रिपाठी आणि कुलकर्णी दोघांनाही काढून टाकण्यात आले. दरम्यान, ममता कुलकर्णीने सांगितले की तिची महामंडलेश्वर बनण्याची कधीच इच्छा नव्हती, परंतु किन्नर आखाड्याच्या आचार्य लक्ष्मी नारायण त्रिपाठी यांच्या दबावामुळे तिने हे पद स्वीकारले.
News Title : Mamta Kulkarni tells the story about bollywood life






