‘तो मला मारहाण करायचा’; प्रसिद्ध अभिनेत्रीचा दिग्दर्शकावर गंभीर आरोप

On: March 4, 2024 9:03 AM
Mamitha Baiju
---Advertisement---

Mamitha Baiju | मनोरंजनसृष्टीमध्ये अनेकांना करिअर करायचं असतं. या झगमगत्या विश्वामध्ये सर्वांना आपलं स्थान निश्चित करायचं असतं. वर्षानुवर्षे काम करूनही अनेकदा अभिनेत्रींना काम मिळत नाही. मग अभिनेत्रींना वेगळ्या मार्गाने पाऊलं टाकावी लागतात. अनेकदा काही दिग्दर्शकांकडून अभिनेत्रींना शरीर सुखाची देखील मागणी केलेली पाहायला मिळाली आहे. आता देखील असाच काहीसा प्रकार घडलेला पाहायला मिळत आहे. (Mamitha Baiju)

नुकतीच आता एक अभिनेत्री प्रसिद्धी झोतात आली आहे. सिनेमाचं शुटिंग करत असताना दिग्दर्शक तिला अनेकदा मारहाण करायचा तिला शिवीगाळ करायचा, असा आरोप तिने केलाय. सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होताना दिसत आहे. त्यामध्ये त्या अभिनेत्रीनं दिग्दर्शकावर गंभीर आरोप केले असल्याचं दिसत आहे. ती दुसरी तिसरी कोणीही नसून मल्याळममधील अभिनेत्री ममिता बैजू (Mamitha Baiju) आहे.

ममिता बैजूने (Mamitha Baiju) एका मल्याळम दिग्दर्शकावर गंभीर आरोप केले आहेत. ममिता बैजू (Mamitha Baiju) म्हणाल्या की दिग्दर्शक आणि मी वनंगान सिनेमासाठी एकत्र काम करत असताना माझ्याबरोबर वाईट वर्तवणुक करण्यात आल्याने मी सिनेमा सोडून दिला आहे.

मुख्य कलाकाराने देखील सिनेमा सोडला

ममिता यांना शिवीगाळ केली आणि अभिनेत्रीशी गैरवर्तन केल्याप्रकरणी ममिता यांनी सिनेमाला राम राम केला आहे. तर या पाठोपाठ सिनेमाचा आघाडीचा अभिनेता सुर्यानं देखील सिनेमातून माघार घेतली आहे, असं एका मुलाखतीमध्ये तिने सांगितलंय.

त्यानं मला मारलं देखील”

वाद्य वाजवण्यासाठी मी शिकत होते. कारण वाद्य वाजवण्याचा सीन होता. वाद्य वाजवणाऱ्या महिला त्या ठिकाणी आल्या. मात्र माझ्या फारसं काही निटसं लक्षात येत नव्हतं. ती महिला काय गात आहे. मला काहीही कळत नव्हतं. मी तीनहून अधिकदा तो सीन करण्याचा प्रयत्न केला पण माझ्याकडून होतच नव्हतं त्यामुळे बाला मला ओरडला, मारलं आणि त्यांनी शिवीगाळ देखील केली.

त्यानंतर ममिता म्हणाली की बालाने त्याच्या स्वभावाबद्दल सांगितलं होतं. त्यामुळे या गोष्टी मनावर घेऊ नको असं त्यानं सांगितलं होतं. हे सुर्याला देखील माहिती होतं, असं ममिता म्हणाली.

News Title – Mamitha Baiju News Update 

महत्त्वाच्या बातम्या

महाशिवरात्रीचा उपवास करत असाल तर ‘या’ चूका करू नका

‘अशा’ व्यक्तींकडे कितीही कमावले तरी पैसे टिकत नाही!

धक्काबुक्की का झाली?; महेंद्र थोरवेंनी सांगितलं खरं कारण

अल्पवयीन मुलीसोबत घडला भयानक प्रकार, ऐकून पायाखालची जमीन सरकेल

सावधान! राज्यातील ‘या’ जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी

Join WhatsApp Group

Join Now