माळशेज घाटात उभा राहणार काचेचा स्कायवॉक, अजित पवार यांच्या सूचना

On: April 29, 2025 5:50 PM
Ajit Pawar
---Advertisement---

Ajit Pawar | ठाणे आणि पुणे जिल्ह्याच्या सीमेवरील निसर्गरम्य पर्यटनस्थळ असलेल्या माळशेज घाटात (Malshej Ghat) पर्यटनाला चालना देण्यासाठी काचेचा स्कायवॉक उभारण्याचा विचार पुढे आला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी यासंदर्भात एकात्मिक प्रस्ताव एक महिन्यात सादर करण्याचे निर्देश पर्यटन विभागाला दिले आहेत.

एमटीडीसी विश्रामगृहाजवळ स्कायवॉक

मुंबईत (Mumbai) उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयातील समिती कक्षात माळशेज घाट येथे काचेचा स्कायवॉक उभारण्याबाबत बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत पवार यांनी निर्देश दिले की, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या विश्रामगृहाशेजारील टेकडीवरील रिकाम्या जागेत हा स्कायवॉक (Skywalk) उभारण्यात यावा.

हा प्रकल्प सार्वजनिक-खाजगी भागीदारी तत्त्वावर राबवण्याची सूचना त्यांनी केली. यासाठी पर्यटन विभागाने सर्व संबंधित बाबींचा विचार करून एक महिन्यात एकत्रित प्रस्ताव सादर करावा, असे आदेश अजित पवार यांनी दिले.

Ajit Pawar | पर्यटन वाढीसाठी महत्त्वाकांक्षी प्रकल्प

माळशेज घाट (Malshej Ghat) हे मुंबई, पुणे, ठाणे, नाशिक आणि अहिल्यानगर या प्रमुख शहरांच्या जवळ असलेले एक लोकप्रिय पर्यटनस्थळ आहे. या ठिकाणचे नैसर्गिक सौंदर्य आणि पर्यटनाची क्षमता लक्षात घेऊन येथे काचेचा स्कायवॉक उभारल्यास मोठ्या संख्येने पर्यटक आकर्षित होतील, असा विश्वास अजित पवार यांनी व्यक्त केला.

यामुळे केवळ पर्यटनाला चालना मिळणार नाही, तर स्थानिक अर्थव्यवस्थेलाही गती मिळेल. या भागाच्या सर्वांगीण विकासासाठी पर्यटन विभागाने (Tourism Department) एकत्रित आणि सुस्पष्ट प्रस्ताव सादर करणे महत्त्वाचे ठरेल, असंही ते म्हणाले.

News Title- Malshej Ghat Skywalk Proposal Directed by Ajit Pawar

Babita Durande

Babita Durande

Join WhatsApp Group

Join Now