महाराष्ट्र हादरला! ‘त्या’ २४ वर्षीय नराधमाने ३ वर्षीय मुलीवर केला अत्याचार

On: November 19, 2025 10:14 AM
Malegaon Crime
---Advertisement---

Malegaon Crime | नाशिक जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यात अंगावर काटा आणणारी घटना समोर आली आहे. डोंगराळे गावात तीन वर्षांच्या चिमुरडीवर लैंगिक अत्याचार करून तिची दगडाने ठेचून हत्या करण्यात आली. या अमानुष आणि क्रूर कृत्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात संताप आणि भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. 16 नोव्हेंबर रोजी घडलेल्या या घटनेनंतर गावातील शांतता पूर्णपणे ढवळून निघाली आहे.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, गावातीलच 24 वर्षीय आरोपी विजय संजय खैरनर याने प्रथम या निरागस मुलीवर लैंगिक अत्याचार केला आणि नंतर तिचे डोके दगडाने ठेचून निर्घृण हत्या केली. घटनेची माहिती मिळताच मालेगाव तालुका पोलिसांनी तत्काळ आरोपीला ताब्यात घेतलं. मुलीचा मृतदेह घरी आणला गेला तेव्हा हृदय पिळवटून टाकणारा आक्रोश उसळला. आई-वडिलांच्या रडण्याने वातावरण दाटून आले होते.

आरोपीची खुनी मानसिकता; जुन्या वादाचा सूड? :

प्राथमिक तपासात धक्कादायक माहिती समोर आली आहे. आरोपी विजय खैरनर (Vijay khairnar) आणि पीडित मुलीच्या वडिलांमध्ये सुमारे महिनाभरापूर्वी वाद झाला होता. त्याचा राग आरोपीच्या मनात होता. या रागातूनच त्याने अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून तिची हत्या केल्याचे तपासात उघड झाले. पोलिसांनी त्याला अटक करून न्यायालयात हजर केले आणि न्यायालयाने त्याला 20 नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

दरम्यान, या प्रकरणाला अत्यंत गांभीर्याने घेत मंत्री दादा भुसे (dada bhuse) आणि पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांनी ही केस फास्टट्रॅक कोर्टात नेण्याचे आश्वासन दिले आहे. तसेच प्रकरणाची सुनावणी प्रसिद्ध सरकारी वकील उज्वल निकम यांच्या मार्फत लढवली जाईल, अशी माहितीही देण्यात आली आहे. त्यामुळे आरोपीला कठोर शिक्षा व्हावी अशी सर्वांची अपेक्षा आहे.

Malegaon Crime | लासलगावमध्ये संतापाचा मूक मोर्चा; आरोपीला फाशीची मागणी :

या भयंकर घटनेनंतर संपूर्ण जिल्हाभरात संतापाची लाट उसळली आहे. लासलगाव (Lasalgaon) येथील सुवर्णकार समाजाने या अमानुष घटनेचा निषेध करत मूक मोर्चा काढला. शिवाजी चौकातून पोलीस ठाण्यापर्यंत काढण्यात आलेल्या या मोर्चात महिलांचा सहभाग मोठा होता. मोर्चादरम्यान सहाय्यक पोलीस निरीक्षक भास्कर शिंदे यांना निवेदन देण्यात आले.

मोर्चात सहभागी झालेल्या महिलांनी आरोपीवर तातडीने फास्टट्रॅक कोर्टात खटला चालवून कठोरातील कठोर अशी फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली. त्याचबरोबर ऑल इंडिया पॅंथर सेनेच्या प्रतिनिधींनीही पोलिसांना निवेदन देत आरोपीला तत्काळ फाशी द्यावी, अशी ठाम भूमिका मांडली. या आंदोलनामुळे नागरिकांचा संताप स्पष्टपणे दिसून आला.

News Title: Malegaon Crime: 3-Year-Old Girl Assaulted and Killed; Maharashtra Shocked, Demands for Fast-Track Trial and Death Penalty

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now