Malaika Arora | मलायका अरोरा-अर्जुन कपूरच्या नात्यात मिठाचा खडा, समोर आली धक्कादायक बातमी

On: December 31, 2023 12:22 PM
Malaika Arora Arjun Kapoor
---Advertisement---

अभिनेत्री मलायका अरोरा (Malaika Arora) आणि अभिनेता अर्जुन कपूर (Arjun Kapoor) यांचं नातं चांगलंच चर्चेचा विषय असतं. मलायकाचं आधी सलमानचा भाऊ अरबाज खानसोबत (Actor Arbaaz Khan) लग्न झालं होतं, त्यांना मुलगाही आहे. मात्र त्यानंतर दोघांनी घटस्फोट घेतला आणि वेगळं आयुष्य जगण्याचा निर्णय घेतला. मलायका एकटी राहिली नाही तीने तिच्यापेक्षा तरुण असलेल्या अर्जुन कपूरसोबत रिलेशन सुरु केलं. दोघांच्या प्रेमाची बी टाऊनमध्ये चांगलीच चर्चा असते अशात एक धक्कादायक बातमी समोर आली आहे.

दोघांच्या नात्याला लागली कुणाची नजर?

मलायका अरोरा (Malaika Arora) आणि अर्जुन कपूर लग्न करतील अशी अटकळ बांधली जात होती, मात्र त्यांनी तसा निर्णय घेतला नाही. आता तर दोघांच्या नात्यात सारं काही आलबेल नसल्याची चर्चा आहे. निमित्त होतं ख्रिसमस आणि अलिकडच्या काळातील पार्ट्यांचं… नेहमी सोबत दिसणारे दोघे आता सोबत हिंडताना फिरताना दिसत नाहीत, त्यामुळे नवीच चर्चा सुरु झाली आहे.

गेल्या काही दिवसांपासून मलायका (Malaika Arora) आणि अर्जुन कपूर यांच्या नात्यात दुरावा निर्माण झाल्याची चर्चा रंगली आहे. ख्रिसमस पार्टीला देखील मलायकासोबत अर्जुन कपूर नव्हता. मलायकाने एकटीने तिच्या मित्रांसोबत ख्रिसमस साजरा केला. अर्जुनसोबत तिची अनुपस्थिती चाहत्यांसाठी चर्चेचा विषय ठरली आहे. दोघांचं ब्रेकअप झाल्याच्या चर्चांनी आता चांगलाच जोर धरला आहे.

अर्जुन कपूर लग्नाबद्दल म्हणालेला…

कॉफी विथ करण (Koffee With Karan) कार्यक्रमात नुकताच अर्जुन कपूरला त्यांच्या लग्नाबद्दल प्रश्न विचारण्यात आला होता. यावेळी त्याने लग्नाबद्दल बोलण्यास नकार दिला. आम्ही दोघं जेव्हा सोबत असू तेव्हाच या विषयावर बोलणं योग्य होईल, असं अर्जुन कपूर म्हणाला होता.

एकीकडे अर्जुननं लग्नाबद्दल असं वक्तव्य केलं असताना दुसरीकडे मलायकाने (Malaika Arora) देखील तिच्या लग्नाबद्दल नवं वक्तव्य केलं आहे. तिच्या वक्तव्याने देखील ब्रेकअपच्या चर्चांना हवा मिळाली आहे.

दुसऱ्या लग्नाबद्दल काय म्हणाली मलायका?

‘झलक दिखला जा’ (Jhalak Dikhhla Jaa) शोमध्ये मलायकाने (Malaika Arora) यासंदर्भात भाष्य केलं. “मी 100 टक्के दुसरं लग्न करण्यासाठी तायर आहे. जर कोणी मला लग्नासाठी विचारलं, तर मी यावर नक्की विचार करेन”, असं मलायकाने म्हटलं आहे. दरम्यान, तीने यावेळी अर्जुन कपूरचा उल्लेख न केल्याने हा विषय चांगलाच चर्चेचा ठरला आहे.

News Title: Malaika Arora Arjun kapoor break up

महत्त्वाच्या बातम्या-

Viral News | पप्पी घेतली, पदर खेचला, उचलून घेतलं… 10वी च्या विद्यार्थ्यासोबतचे मुख्याध्यापिकेचे नको ते चाळे व्हायरल

Maharashtra | महाराष्ट्राला धक्का देणारी बातमी समोर!

SBI ने ग्राहकांना दिली आनंदाची बातमी!

Ram Mandir | ’22 जानेवारीला घराघरात…’; नरेंद्र मोदींचं देशवासीयांना आवाहन

महत्त्वाची बातमी- 1 जानेवारीपासून तुमच्या Paytm-Gpayची UPI आयडी होऊ शकते बंद

Krishna Varpe

Mahesh Patil

Join WhatsApp Group

Join Now