एआर रहमानचा साऊंड असलेल्या महिंद्राच्या ”या’ भन्नाट कारची फीचर्स जाणून घ्या!

On: October 16, 2024 1:16 PM
Mahindra New Car
---Advertisement---

Mahindra New Car l महिंद्रा कंपनी आपल्या ग्राहकांसाठी नवनवाईन फीचर्ससह कार लाँच करत असते. अशातच आता महिंद्रा कंपनीच्या Mahindra BE 05 या इलेक्ट्रिक कारची सर्वत्र चर्चा आहे. कंपनी आपली भविष्यातील इलेक्ट्रिक एसयूव्ही सीरीज लवकरच बाजारात आणणार आहे. कारण Mahindra BE 05 पुढील वर्षाच्या सुरूवातीस किंवा वर्षाच्या अखेरीस सादर केले जाणार आहे.

फीचर्स काय असणार? :

Mahindra BE 05 ही स्पोर्टी कूप स्टाइल SUV आहे. ही कार सिंगल मोटर किंवा ड्युअल मोटर लेआउट BE 05 मध्ये आढळू शकते. BE 05 ला 79 kWh चा बॅटरी पॅक असणार आहे. तसेच महिंद्रा कंपनीने इलेक्ट्रिक वाहनांमध्ये ड्राइव्ह मोड साउंड तयार करण्यासाठी AR रहमानचा आवाजाचा देखील समावेश केला आहे.

फीचर्सबद्दल बोलायचे झाले तर यामध्ये प्रीमियम 16 ​​स्पीकर ऑडिओ सिस्टम असेल, ज्यामध्ये डॉल्बी ॲटमॉस आणि हरमन कार्डनसह नॉईज कॅन्सलेशन प्रदान केले जाईल. तसेच यामध्ये टचस्क्रीन स्क्रीन डॉमिनेटेड लेआउट देखील असेल. याशिवाय फास्ट चार्जिंग, व्हेइकल-टू-लोड (V2L) आणि इतर फीचर्सही या सीरिजच्या कारमध्ये पाहायला मिळतील.

Mahindra New Car l किंमत किती असणार? :

एआर रहमान आणि त्यांची टीम ड्राईव्ह मोड आणि डॅशबोर्ड तसेच इतर सर्व फंक्शन्ससाठी सर्व आवाज विकसित करणार आहे. या महिंद्रा ईव्हीची किंमत 20 ते 25 लाख रुपये असणार आहे. याशिवाय या कारमध्ये एक स्प्लिट रूफ माउंटेड स्पॉयलर आणि एक मोठा एलईडी लाइट बार देखील असणार आहे.

तसेच या कारचा ग्राउंड क्लिअरन्स देखील चांगला आहे. कंपनीच्या इलेक्ट्रिक रेंजमध्ये थार इलेक्ट्रिकही येणार आहे. येत्या काही वर्षांत महिंद्राची अनेक इलेक्ट्रिक वाहने रस्त्यावर धावताना दिसणार आहेत.

News Title : Mahindra BE 05 Launching Soon

महत्वाच्या बातम्या-

माजी खासदाराच्या पुतण्याने केली आत्महत्या!

अजितदादांना मोठा धक्का, ऐन निवडणुकीच्या तोंडावर 600 पदाधिकाऱ्यांचे राजीनामे

विधानसभेपूर्वी रुपाली चाकणकरांची मोठी खेळी!

आज राज्यातील ‘या’ ठिकाणी वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता!

संतापजनक! ठाण्यात बदलापूरची पुनरावृत्ती, नराधम निघाला ‘या’ पक्षाचा पदाधिकारी

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now