अखेर ठरलं! मविआचा जागावाटपाचा तिढा सुटला, कोण किती जागांवर लढणार?

On: October 23, 2024 9:40 AM
Mahavikas Aaghadi
---Advertisement---

Mahavikas Aghadi | विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात राजकीय हालचालींना वेग आला आहे. निवडणुकीसाठी भाजप आणि शिंदे गटाने उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. तर, महाविकास आघाडीमध्ये अजूनही जागावाटपवरून तिढा निर्माण झाल्याचं बोललं जातंय. त्यातच ठाकरे गट आणि कॉँग्रेसमधील अंतर्गत वादही चव्हाट्यावर दिसून आला. अखेर मविआमधील जागावाटपावरून सुरू असलेली रस्सीखेच ही थांबली आहे.जागावाटपात काँग्रेस मोठा भाऊ ठरला आहे. (Mahavikas Aghadi )

मिळालेल्या माहितीनुसार, काँग्रेस सर्वाधिक 105 जागा लढणार असल्याचं कळतंय. तर, शिवसेना उद्धव ठाकरे गट 95 जागांवर आपले उमेदवार देणार आहे. शरद पवार गट 84 जागांवर लढणार असल्याची माहिती समोर आली आहे. महाविकास आघाडीकडून आज (23 ऑक्टोबर) यादी जाहीर केली जाण्याची शक्यता आहे.

निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर होण्याआधीच मविआत जागावाटपासाठी बैठका झाल्या. आता निवडणूक अर्ज प्रक्रिया सुरू झाली पण, महाविकास आघाडीचं जागावाटप झालं नाही. अखेर महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांचं जागावाटपाबाबत एकमत झालं आहे.

कोण किती जागा लढणार?

काँग्रेस- 105 जागा

शिवसेना उद्धव ठाकरे गट – 95 जागा

राष्ट्रवादी शरद पवार गट – 84 जागा (Mahavikas Aghadi )

नाना पटोले-राऊत वाद

निवडणुकीसाठी जागावाटपावर चर्चा करण्यासाठी महाविकास आघाडीमध्ये एक समिती नेमण्यात आली होती. यामध्ये ठाकरे गटाकडून संजय राऊत, राष्ट्रवादीकडून जयंत पाटील तर कॉँग्रेसकडून नाना पटोले समितीत होते. मात्र विदर्भातील जागांवरून नाना पटोले आणि संजय राऊत यांच्यात चांगलाच वाद रंगला होता.हा वाद थेट दिल्ली हायकमांडपर्यंत पोहोचला होता. त्यानंतर काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी उद्धव ठाकरेंची भेट घेतली होती. अखेर हा वाद देखील आता संपला आहे. (Mahavikas Aghadi )

News Title : Mahavikas Aghadi Seat Allocation

महत्वाच्या बातम्या –

मनसेची दुसरी उमेदवारी यादी जाहीर, राज’पुत्र’ अमित ठाकरे निवडणुकीच्या रिंगणात

शिवसेना शिंदे गटाची पहिली यादी जाहीर; पाहा कुणा-कुणाला मिळालं तिकीट?

आज सिद्धी योगात 12 पैकी ‘या’ राशींवर होणार धनवर्षाव!

“माझे गुरु मला घरी बोलवायचे आणि ते मला…”, कुस्तीपटू साक्षी मलिकच्या खुलाशाने खळबळ!

महाराष्ट्राच्या राजकारणात भूकंप होणार; एकनाथ शिंदे पुन्हा गुवाहाटीला जाणार?

Join WhatsApp Group

Join Now