राज्यातील ‘या’ भागांना पावसाचा यलो अलर्ट जारी!

On: February 10, 2024 2:41 PM
Maharashtra Weather
---Advertisement---

Maharashtra Weather | गेल्या आठवड्यापासून राज्यातील वातावरण सतत बदलताना दिसून येत आहे. राज्यात काही भागांमध्ये गारवा जाणवत आहे. सकाळी आणि रात्री थंड वारे वाहत आहेत, तर दुपारून मात्र उष्णता जाणवत आहे. काही ठिकाणी ढगाळ (Maharashtra Weather) वातावरण तयार झाले आहे. आता हवामान खात्याने मुंबई सह राज्यातील काही भागांत पावसाची शक्यता वर्तवली आहे.

हवामान खात्याच्या अंदाजानुसार, 11 आणि 12 फेब्रुवारी रोजी मुंबईत दुपारपासून ढगाळ वातावरण असणार आहे. मुंबईमध्ये तशी पाऊसाची शक्यता थोडी कमी आहे. मात्र, राज्यातील काही भागांत यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्यामुळे महाराष्ट्रासह देशातील इतर राज्यांत पुढील 4 ते 5 दिवस मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.

प्रादेशिक हवामान विभागाचे संचालक सुनील कांबळे यांनी हवामान विषयी माहिती दिली आहे. त्यांनी सांगितल्यानुसार या आठवड्यामध्ये रविवारी आणि सोमवारी दुपारनंतर ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्रातही असेच वातावरण असेल.

‘या’ भागांना यलो अलर्ट जारी

हवमान खात्यानुसार (Maharashtra Weather) महाराष्ट्रातील काही भागांना यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्यात अमरावती, अकोला, बुलढाणा, चंद्रपूरसह काही भागांचा समावेश आहे. मात्र मुंबईमध्ये पावसाची शक्यता नसल्याने मुंबईमध्ये कोणताही अलर्ट दिला नाही.

देशातील ‘या’ भागांत मुसळधार पावसाची शक्यता

देशातील (Maharashtra Weather) महाराष्ट्रासह अरुणाचल प्रदेश, पश्चिम बंगाल, सिक्कीम, ओडिसा, मध्य प्रदेश, बिहार, झारखंड, पश्चिम बंगालमध्ये पुढील 5 दिवसांत मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

यासोबतच उत्तर प्रदेशसह अनेक राज्यांमध्ये पुन्हा पाऊस पडू शकतो. यामुळे तापमानात घट होण्याची शक्यताही वर्तवण्यात आली आहे. उत्तर भारतात थंडीमुळे अनेकांचा जीव गेला आहे. आता पाऊस पडला तर पुन्हा थंडी पडण्याची शक्यता आहे.

News Title- Maharashtra Weather Yellow alert for rain in some parts

महत्वाच्या बातम्या- 

मॉरिसनं 10 दिवसांपूर्वी टाकलेल्या पोस्टमध्ये दिले होते संकेत, काय होती ती पोस्ट?

“गाडीखाली श्वान आलं तरी…”, घोसाळकरांच्या हत्येनंतर फडणवीस यांची पहिली प्रतिक्रिया

“रविंद्रला क्रिकेटर नसतं बनवलं तर बरं झालं असतं”

“घोसाळकरांची हत्या करणाऱ्या मॉरिसला शिंदेंनी दिली होती ऑफर”, नव्या दाव्याने मोठी खळबळ

बापाकडूनच पोटच्या मुलीवर बलात्कार, 14 वर्षांची मुलगी गर्भवती झाल्याने प्रकार उजेडात

Join WhatsApp Group

Join Now