महाराष्ट्राच्या वातावरणाला नेमकं झालंय काय?, हवामान विभागाचा महत्त्वाचा इशारा

On: February 12, 2025 10:37 AM
Weather Update
---Advertisement---

Maharashtra Weather Update | महाराष्ट्रामध्ये सध्या दिवसा आणि रात्री जाणवणाऱ्या तापमानात मोठा फरक दिसून येत आहे. फेब्रुवारीचा अर्धा महिना उलटून गेला असला, तरी थंडी पूर्णपणे गायब झालेली नाही. सकाळी आणि रात्री थंडी वाजत असली, तरी दिवसा उन्हाचा चटका बसत आहे. हवामान विभागाने (India Meteorological Department) दिलेल्या माहितीनुसार, येत्या आठवड्यात किमान तापमानात थोडी घट होण्याची शक्यता आहे.

तापमानात घट होण्याची शक्यता

पुढील तीन दिवसात राज्यातील अनेक भागांमध्ये थंडी वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. यात प्रामुख्याने मुंबई (Mumbai), ठाणे (Thane), जळगाव (Jalgaon), धुळे (Dhule), नंदुरबार (Nandurbar) आणि नाशिक (Nashik) जिल्ह्यांचा समावेश आहे. अहमदनगर (Ahmednagar) जिल्ह्यातील अकोला (Akola), संगमनेर (Sangamner), कोपरगाव (Kopargaon), राहता (Rahta), श्रीरामपूर (Shrirampur) या तालुक्यांमध्ये, तसेच छत्रपती संभाजीनगर (Chatrapati Sambhajinagar) जिल्ह्यातील वैजापूर (Vaijapur), कन्नड (Kannad) आणि सोयगाव (Soygaon) तालुक्यातही थंडी वाढू शकते.

११ ते १३ फेब्रुवारी आणि १७ व १८ फेब्रुवारी या काळात थंडीची तीव्रता अधिक जाणवण्याची शक्यता आहे. उत्तरेकडून येणारे थंड वारे, उत्तर आणि उत्तर-वायव्य महाराष्ट्रापर्यंत पोहोचण्याची शक्यता असल्यामुळे, किमान तापमानात घट होईल, असा अंदाज निवृत्त हवामान शास्त्रज्ञ माणिकराव खुळे (Manikrao Khule) यांनी व्यक्त केला आहे.

वाऱ्यांच्या बदलत्या स्थितीचा परिणाम

गेल्या दोन आठवड्यांपासून वाऱ्यांची दिशा सतत बदलत आहे. वाऱ्यांचे अस्थिर वहन महाराष्ट्रावर (Maharashtra) टिकून असल्यामुळे उत्तरेकडील थंड वाऱ्यांना अटकाव होत आहे.महाराष्ट्रावर हवेचा उच्च दाब तसेच प्रत्यावर्ती चक्रीय वाऱ्यामुळे उत्तरेकडील थंड वारे अडवले जात आहेत.

सध्याचा वाऱ्यांच्या वहनाचा पॅटर्न बदलत नाही, तोपर्यंत थंडीची शक्यता कमी आहे. जोपर्यंत उत्तरेकडून थंडीला पोषक वारे वाहत नाहीत, तोपर्यंत थंडी वाढणार नाही, असा अंदाजही खुळे यांनी वर्तवला आहे. उर्वरित २८ जिल्ह्यांमध्ये वातावरणात कोणताही मोठा बदल संभवत नाही.

Title : Maharashtra Weather Update today 12 february  

 

Join WhatsApp Group

Join Now