Maharashtra Weather Update | महाराष्ट्रात (Maharashtra Weather Update ) काल रविवारी ढगाळ वातावरण होते त्यामुळे पावसाची शक्यता निर्माण झाली होती, पण पाऊस झाला नाही. फेब्रुवारीच्या सुरुवातीलाच अनेक भागांमध्ये उष्णता वाढली असून, कमाल तापमान ४० अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचले आहे. होळीनंतर (Holi) तापमान वाढते, परंतु यावेळी महिनाभर आधीच तापमान वाढ झाली आहे. अशातच, हवामान खात्याने (IMD) पुढील २४ तासांत राज्यात वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज वर्तवला आहे.
कुठे जाणवणार पावसाचा प्रभाव?
हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, पुढील २४ तासांत राज्यात वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. किनारपट्टी क्षेत्रात (Coastal area) याचा प्रभाव अधिक जाणवेल. त्यानंतर उष्ण आणि दमट हवामान राहण्याचा अंदाज आहे. वाऱ्याचा दबाव आणि समुद्रातील तापमानामुळे पाऊस पडण्याची शक्यता आहे.
किनारपट्टीवर पावसाची शक्यता असली तरी विदर्भात (Vidarbha) उकाडा कायम आहे. चंद्रपूर (Chandrapur) आणि वर्धा (Wardha) जिल्ह्यात कमाल तापमान ३८ अंशांपर्यंत पोहोचले आहे, तर रत्नागिरी (Ratnagiri), सिंधुदुर्ग (Sindhudurg), पुणे (Pune), सातारा (Satara) आणि सांगली (Sangli) जिल्ह्यात तापमान ३६ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचले आहे.
मुंबईकरांना उकाड्यापासून दिलासा नाही
मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये दुपारच्या वेळी उष्मा वाढला आहे. हवामान खात्याने तापमान वाढीचा इशारा दिला असून, नागरिकांना उष्माघातापासून (heatstroke) बचाव करण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय करण्याचा सल्ला दिला आहे. (Maharashtra Weather Update )
हवामान खात्याने नुकत्याच घेतलेल्या पत्रकार परिषदेत, मार्च महिन्यात उष्णतेच्या लाटा (heat waves) मोठ्या प्रमाणावर येणार असून, उन्हाळा अधिक तापदायक ठरणार असल्याचे सांगितले. केवळ महाराष्ट्रच नाही, तर संपूर्ण देशात हवामानाची वेगवेगळी स्थिती दिसून येत आहे.
Title : Maharashtra Weather Update Thunderstorms and Heatwave to Continue






