महाराष्ट्रातील ‘या’ भागात ढगांच्या गडगडाटासह अवकाळी पाऊस, हवामान खात्याचा इशारा!

On: May 5, 2025 1:07 PM
maharashtra weather
---Advertisement---

Maharashtra Weather | राज्याच्या अनेक भागांमध्ये तापमान चाळीस अंश सेल्सियसच्या वर पोहोचले आहे. अशातच, हवामान खात्याने पुढील चार ते पाच दिवसांसाठी मेघगर्जनेसह पावसाची शक्यता वर्तवली आहे. काही ठिकाणी गारपीट होण्याचाही अंदाज आहे, ज्यामुळे वातावरणात बदल अपेक्षित आहे. नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

येत्या काही दिवसांत पावसाळी हवामान-

पुढील ४ ते ५ दिवस राज्यभरात (Maharashtra Weather) ढगांच्या गडगडाटासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली असून, काही ठिकाणी गारपीटही होऊ शकते. विशेषतः मुंबई (Mumbai) शहरात ६ आणि ७ मे रोजी पावसाच्या सरी कोसळण्याचा अंदाज आहे. यासोबतच, उत्तर महाराष्ट्रातील नाशिक (Nashik), धुळे (Dhule), नंदुरबार (Nandurbar) आणि जळगाव (Jalgaon) या जिल्ह्यांमध्ये ५ ते ७ मे या कालावधीत अवकाळी पावसाचा जोर अधिक असेल आणि गारपीट होण्याची दाट शक्यता आहे.

पश्चिम महाराष्ट्रातील अहिल्यानगर (Ahmadnagar), पुणे (Pune), सातारा (Satara), सांगली (Sangli), कोल्हापूर (Kolhapur), सोलापूर (Solapur) येथे ६ आणि ७ मे रोजी अवकाळी पाऊस व गारपिटीची शक्यता आहे. मराठवाड्यात ७ मे रोजी तर विदर्भात (Vidarbha) ५ मे रोजी अशीच स्थिती अपेक्षित आहे. दुसरीकडे, कोकण (Konkan) विभागात सध्या तापमान ३४ ते ३५ अंश सेल्सियस तर विदर्भात ते ४२ ते ४४ अंश सेल्सियसच्या दरम्यान नोंदवले जात आहे.

वाढती उष्णता आणि पीक विमा योजनेतील बदल-

सध्या राज्यात उन्हाचा कडाका असह्य होत चालला आहे. रविवारी वाशिम (Washim) येथे राज्यातील सर्वाधिक ४२.८ अंश सेल्सियस तापमानाची नोंद झाली. त्याखालोखाल नाशिक जिल्ह्यातील मालेगाव (Malegaon) येथे ४२.४ अंश सेल्सियस तापमान नोंदवण्यात आले. वाढत्या तापमानामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे.

राज्यभरात तापमानात लक्षणीय वाढ झाली असून, उष्णतेच्या तीव्र झळांमुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. दिवसा घराबाहेर पडणेही कठीण झाले आहे, इतकी उष्णता अनेक जिल्ह्यांमध्ये जाणवत आहे. याचा परिणाम लोकांच्या दैनंदिन कामांवर होत आहे. दरम्यान, राज्यात शेतकऱ्यांसाठी असलेली एक रुपयात पीक विमा योजना बंद करण्यात आली असून, आता ही योजना वेगळ्या पद्धतीने राबवली जाणार असल्याची माहिती आहे.

News Title – Maharashtra Weather update Rain Hail Forecast

Mrudula Jogdand

Mrudula Jogdand

Join WhatsApp Group

Join Now