‘या’ जिल्ह्यांत आज वीजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस बरसणार!

On: October 11, 2024 8:21 AM
Weather Update
---Advertisement---

Maharashtra Weather Update | राज्यात सध्या पावसाचा परतीचा प्रवास सुरू आहे. गेल्या काही दिवसापासून पावसाने पुन्हा एकदा जोरदार हजेरी लावली आहे. सध्या मुंबईसह मराठवाडा आणि विदर्भात पावसाच्या सरी बरसत आहेत. आज 11 ऑक्टोबररोजी देखील काही ठिकाणी मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये वीजांचा कडकडाट आणि ढगांच्या गडगडाटासह पाऊस पडण्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. (Maharashtra Weather Update)

राज्यातील मुंबई, ठाणे, पालघर आणि छत्रपती संभाजीनगर येथे सध्या जोरदार पाऊस पडतोय. पावसामुळे शहरातील अनेक भागात पुन्हा एकदा पाणी साचायला सुरुवात झाली आहे. ठाणे, कल्याण आणि डोंबिवली येथे देखील चांगलाच पाऊस पडतोय. मुंबई आणि ठाण्यात 14 तारखेपर्यंत पावसाचा अंदाज आहे.

परतीच्या पावसाने शेतीचे नुकसान

पालघर जिल्ह्यात देखील वीजांच्या कडकडाटासह पाऊस झाला. यामुळे काढणीसाठी आलेल्या भात शेतीचं मोठं नुकसान झालं आहे. शेतकऱ्यांना याचा मोठा फटका बसलाय. येथे अजूनही पावसाच्या सरी बरसत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता आणखीनच वाढली आहे.

अकोल्यात देखील जोरदार पाऊस बरसत आहे. मागील 24 तासात येथे मुसळधार पावसाची नोंद झाली. जिल्हातल्या मुर्तीजापूर तालुक्यात देखील विजांचा कडकडाटासह पाऊस झाला. या दरम्यान वीज पडून शेतात काम करणाऱ्या एका 23 वर्षीय युवकाचा मृत्यू तर एक महिला जखमी झाली. (Maharashtra Weather Update )

आज ‘या’ ठिकाणी जोरदार बरसणार

यवतमाळ येथे देखील जोरदार पावसाने हजेरी लावली. काही दिवसांपूर्वी येथे सूर्य आग ओकत असल्याने घामाच्या धारा लागल्या होत्या. मात्र, आता पडलेल्या पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला आहे. यामुळे नागरिकांना दिलासा मिळाला आहे. दरम्यान, आज देखील येथे जोरदार पाऊस हजेरी लावणार असल्याचा अंदाज आहे.

आज पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, धुळे, जळगाव, नाशिक, अहमदनगर, पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, बीड, हिंगोली, नांदेड, बुलढाणा, वाशिम, यवतमाळ जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. (Maharashtra Weather Update )

News Title –  Maharashtra Weather Update 11 october 

महत्वाच्या बातम्या-

नवरात्रीचा आज नववा दिवस, देवी सिद्धिदात्री 12 पैकी ‘या’ राशींना पावणार!

पुण्यातील शाळेत घडला धक्कादायक प्रकार! सँडविचमधून 350 विद्यार्थ्यांना विषबाधा

शिल्पा शेट्टीवर ईडीची टांगती तलवार; राहतं घर खाली करण्याची दिली नोटीस

मंत्रिमंडळाने घेतले मोठे निर्णय! पाहा तुमच्या फायद्याचा निर्णय आहे का?

‘या’ कारणामुळे सलमान खानसह बिग बॉस 18 अडचणीत सापडणार?

Join WhatsApp Group

Join Now