‘या’ भागावर अवकाळी पावसाचं संकट कायम; यलो अलर्ट जारी

On: April 26, 2024 7:25 AM
Maharashtra Weather today 
---Advertisement---

Maharashtra Weather | महाराष्ट्रावर अवकाळी पावसाचं संकट कायम असल्याचं हवामान विभागाने म्हटलं आहे. पूढील 48 तासांत जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या चिंतेत अजूनच भर पडली आहे. एप्रिल महिन्याच्या अगदी सुरुवातीपासूनच राज्यातील काही भागांना अवकाळीने झोडपलं आहे. यामुळे शेतीचं प्रचंड नुकसान झालं आहे. अजूनही पाऊस पडणार म्हटल्यावर ही चिंता अजूनचआणखी वाढली आहे.

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भाच्या जिल्ह्यांमध्ये पुढील 48 तासांत पावासाची शक्यता आहे. काही जिल्ह्यामध्ये विजांच्या कडकडाटासह वादळ आणि 30-40 किमी प्रतितास वेगाने सोसाट्याचा वारा आणि हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर, काही ठिकाणी उष्णतेची लाट येणार आहे.

‘या’ भागात उष्णता वाढणार

राज्यात कुठे तीव्र उष्णता तर कुठे अवकाळी पाऊस असं दृश्य पाहावयास मिळत आहे. आता आयएमडीने मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, जळगाव, नाशिक, अहमदनगर या भागात उष्णतेचा यलो अलर्ट जारी केला आहे. मुंबईत तर उकाडा प्रचंड वाढला आहे. इथे जराही उष्णतेपासून दिलासा मिळालेला नाही.

तसंच कोकणातील तुरळक क्षेत्रात उष्ण आणि दमट परिस्थिती राहण्याची शक्यता आहे. कोकणातील तुरळक भागात उष्णतेची लाट येण्याची शक्यताही हवामान विभागाने(Maharashtra Weather) वर्तवली आहे. त्यामुळे येथील नागरिकांना आरोग्याबाबत विशेष आवाहन करण्यात आलंय.

‘येथे’ अवकाळी पावसाचे संकट कायम

आज 26 एप्रिलरोजी सोलापूर, धुळे, नंदुरबार, पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली या भागात पावसाची शक्यता आहे. तर उद्या 27 एप्रिलला जळगाव, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, जालना या जिल्ह्यात पावसाची हजेरी दिसून येईल.त्यामुळे या दोन दिवसांत या भागांना पावसाचा हायअलर्ट देण्यात आला आहे.

काल 25 एप्रिलरोजी छत्रपती संभाजीनगरसह मराठवाड्यातील काही भागांत वादळी वारा आणि वीजांच्या कडकडाट्यासह पाऊस झाला. त्यामुळे इथे उकाड्यापासून काही अंशी (Maharashtra Weather) दिलासा मिळाला आहे. आज पुन्हा या ठिकाणी पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे.

News Title : Maharashtra Weather today 

महत्त्वाच्या बातम्या-

‘या’ राशीच्या लोकांना व्यवसायात दुप्पट फायदा होईल!

अंबादास दानवेंचा मास्टरस्ट्रोक, थेट एकनाथ शिंदे यांचा ‘तो’ व्हिडीओ केला पोस्ट

‘जावई 25 व्या वर्षात 2 फ्लॅटवाला पाहिजे’; पुण्यातील तरूणाने पालकांना दाखवला आरसा

उपमुख्यमंत्री अजित पवारांनी वाहतूक नियम बसवले धाब्यावर, उलट्या दिशेनं हाकली वाहनं!

गॅलेक्सी अपार्टमेंट बाहेर झालेल्या गोळीबाराबाबत धक्कादायक माहिती समोर!

Join WhatsApp Group

Join Now