राज्यात अवकाळी पावसानंतर आता उष्णतेच्या लाटेचा इशारा!

On: April 15, 2024 2:45 PM
health Update
---Advertisement---

Maharashtra Weather News | राज्यात गेल्या काही दिवसांपासून मुळसधार पाऊस झाला आहे. या पावसामुळे उष्णतेपासून काही प्रमाणात दिलासा मिळला होता. आता पुन्हा एकदा हवामान विभागाने उष्णता वाढणार असल्याची शक्यता वर्तवली आहे. तसंच काही भागात आजही यलो अलर्ट देण्यात आलाय.

आजही (15 एप्रिल) काही ठिकाणी पावसाचा इशारा देण्यात आला आहे. गेल्या तीन-चार दिवसांत विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात झालेल्या पावसामुळे पिकांचं प्रचंड नुकसान झालं आहे. आजही येथे पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे.

‘या’ भागांना आजही यलो अलर्ट

हवामान विभागाकडून मराठवाड्यातील लातूर, बीड, नांदेड, परभणी, जालना, हिंगोली या तर विदर्भातील बुलढाणा, यवतमाळ, अकोला, वाशिम, अमरावती, नागपूर या जिल्ह्यांना आज पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे.

वातावरणाच्या खालच्या थरातील वाऱ्यांची द्रोणीय रेषा आज ही कोमोरीन एरियावर (Maharashtra Weather News) असलेल्या चक्रीय स्थिती पासून कोकण गोव्यापर्यंत केरळ व कर्नाटक वरून गेली आहे.तर एक पूर्व पश्चिम द्रोणिका रेषा राजस्थानच्या दक्षिण भगातून तर लगतच्या गुजरातवर असलेली चक्रीय स्थिती ही उत्तर ओडिषापर्यंत मध्य प्रदेश, छत्तीसगड व दक्षिण झारखंड वरून गेली आहे. यामुळे आजही राज्याच्या काही भागात पावसाची शक्यता आहे.

राज्यात उकाडा वाढणार

येत्या काही दिवसांत आता पावसाचा जोर ओसरणार आहे. राज्यात (Maharashtra Weather News) पाऊस कमी होणार आहे. अवकाळी पावसाच्या तडाख्यानंतर आता उष्णतेची लाट येणार आहे. 16 एप्रिलनंतर बऱ्याच ठिकाणी कोरडं हवामान राहणार आहे. मुंबईसह मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रात येत्या काही दिवसांत तापमानात वाढ होणार आहे.

पुण्यात सध्या तापमान हे 40 पार गेलं आहे. पुढील काही दिवस पुण्यात कमाल तापमानात दोन ते तीन डिग्री सेल्सिअस पर्यंत वाढ होण्याची शक्यता आहे.मुंबईतही उकाडा वाढणार आहे. त्यामुळे नागरिकांनी बाहेर पडतांना काळजी घेण्याचा इशारा देण्यात आला आहे. दिवसा कोरडे हवामान राहणार आहे. तर आकाश निरभ्र राहणार आहे.

News Title : Maharashtra Weather News Heat wave alert

महत्त्वाच्या बातम्या-

एका रात्रीत तुझं पार्सल बीडला पाठवणार, धैर्यशील मोहिते पाटलांचा ‘या’ दिग्गज नेत्यावर हल्लाबोल

Oops… रोहितच्या एका हातात पँट तर एका हातात बॉल; रोहितसोबत घडली विचित्र घटना

आज रॉयल चॅलेंजर्स बंगलोर विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद हे संघ भिडणार

या राशीच्या व्यक्तींना जमिनीच्या व्यवहारात यश मिळेल

एकनाथ शिंदे यांचा एक फोन आणि मॅटर सॉल्व, भिवंडीत नेमकं काय घडलं?

Join WhatsApp Group

Join Now