Weather News l दिवाळी अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. मात्र तरीदेखील राज्यात पाऊस काही प्रमाणात हजेरी लावत आहे. अशातच आज देखील हवामान विभागाने महाराष्ट्रातील काही भागात पावसाचा इशारा दिला आहे. पुढील 24 तासांमध्ये महाराष्ट्राच्या कोकणासह मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात वादळी वाऱ्यांचा इशारा हवामान खात्याने दिला आहे.
आज राज्यातील काही भागात यलो अलर्ट जारी :
याशिवाय हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार, दक्षिण महाराष्ट्रामध्ये देखील मुसळधार पावसाचा इशारा देत यलो अलर्ट जारी केला आहे. मात्र पावसाच्या इशाऱ्यामुळे राज्यातील तापमानात चढ उतार होण्याची शक्यताही वर्तवण्यात आली आहे. तसेच आज राज्यात सरी, वादळी वारे आणि तापमानात देखील बदल होणार आहेत.
अशातच कोकण विभागातील अनेक भागांमध्ये आज वादळी वाऱ्यांसह पाऊस हजेरी लावणार आहे. याशिवाय यादरम्यान ताशी 30 ते 40 किमी वेगानं वारे देखील वाहणार आहेत. तसेच रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि कोल्हापूर व साताऱ्यातील घाटमाथ्यावर वातावरण थंड होणार आहे. मात्र या दरम्यान मुंबई शहर व उपनगरामध्ये उन्हाचा कडाका अधिक जाणवणार आहे.
Weather News l ‘दाना’ चक्रीवादळ कुठवर पोहोचलं?
सर्वात महत्वाचं म्हणजे आज दाना चक्रीवादळ देखील थकणार आहे. मात्र या चक्रीवादळाचा परिणाम हा ओडिशा आणि भुवनेश्वरसह पश्चिम बंगालच्या किनारपट्टी भागांमध्ये दिसून येणार आहे. याशिवाय आज रात्रीपर्यंत हे चक्रीवादळ रौद्र रूप धारण करणार असल्याचं सांगण्यात आलं आहे.
याशिवाय सदर क्षेत्रांमध्ये समुद्रकिनारी भागात मोठं मोठ्या लाटा उसळणार असल्याने नौका समुद्रात न उतरवण्याचा इशारा देखील देण्यात आलं आहे. तसेच 24 आणि 25 ऑक्टोबर रोजी ओडिशा आणि पश्चिम बंगालच्या किनारपट्टी भागात वादळाचा लँडफॉल सुरु होणार होणार आहे.
News Title : Maharashtra weather news
महत्वाच्या बातम्या –
अखेर ठरलं! मविआचा जागावाटपाचा तिढा सुटला, कोण किती जागांवर लढणार?
मनसेची दुसरी उमेदवारी यादी जाहीर, राज’पुत्र’ अमित ठाकरे निवडणुकीच्या रिंगणात
शिवसेना शिंदे गटाची पहिली यादी जाहीर; पाहा कुणा-कुणाला मिळालं तिकीट?
आज सिद्धी योगात 12 पैकी ‘या’ राशींवर होणार धनवर्षाव!
“माझे गुरु मला घरी बोलवायचे आणि ते मला…”, कुस्तीपटू साक्षी मलिकच्या खुलाशाने खळबळ!






