राज्यातील ‘या’ भागांना अवकाळीचा तडाखा बसणार, हवामान विभागाचा इशारा

On: April 24, 2024 11:22 AM
Maharashtra Weather Latest update
---Advertisement---

Maharashtra Weather Latest update | राज्यात सध्या ऊन-पावसाचा खेळ सुरू आहे. कुठे उष्णतेच्या लाटा तर कुठे अवकाळी पावसाचा तडाखा असं वातावरण सध्या महाराष्ट्रात दिसून येत आहे. आजही (24 एप्रिल) काही भागांना पावसाचा यलो यांनो ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.

विदर्भ आणि मराठवाड्यात वादळी वाऱ्याचा पावसाचा अंदाज वर्तवला आहे. त्यामुळे नागरिकांनी घराबहेर पडताना विशेष काळजी घ्यावी, असं आवाहन करण्यात आलंय.तर काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह वीजांचा कडकडाट आणि मेघ गर्जनेसह गारपीट होण्याची शक्यताही वर्तवली आहे.

‘या’ भागांना पावसाचा यलो आणि ऑरेंज अलर्ट

वातावरणाच्या खालच्या थरातील वाऱ्याची द्रोणीका रेषा ही छत्तीसगड ते दक्षिण केरळपर्यंत आहे. ही द्रोणीका रेषा मराठवाडा व लगतच्या विदर्भावर असलेल्या चक्रीय स्थिती मधून जात असल्याने या भागात तुर्क ठिकाणी पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

पुढील दोन दिवस कोकण वगळता उर्वरित राज्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात पुढील दोन ते तीन दिवस मेघगर्जना आणि वादळी वाऱ्यासह विजांचा कडकडाट आणि पाऊस होण्याची शक्यता आहे.

विदर्भातील अमरावती, नागपूर, वर्धा यवतमाळ येथे पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. या ठिकाणी 40 ते 50 किमी वेगाने वादळी वारे वाहण्याची शक्यता असून गारपीट होण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तर, मध्य महाराष्ट्र (Maharashtra Weather Latest updat) व मराठवाड्यात यलो अलर्ट देण्यात आला आहे.

‘या’ भागात उष्णतेची लाट

कोकणात आणि मुंबई ठाण्यात उष्णतेच्या लाटेची शक्यता वर्तवण्यात आली आहे.रत्नागिरी व सिंधुदुर्ग मध्ये 25 एप्रिलला वातावरण उष्ण व दमट राहून हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे कोकणात उष्णतेचा यलो अलर्ट देण्यात आला आहे.

News Title : Maharashtra Weather Latest update

महत्त्वाच्या बातम्या-

‘अमरावतीत हिंदू- मुस्लिम दंगल घडू शकते’, बड्या नेत्याच्या दाव्याने खळबळ

देशातील सर्वात श्रीमंत उमेदवार कोण?,संपत्तीचा आकडा ऐकून बसेल धक्का

“पैशाची मस्ती आलीये काय?, निवडणूक आहे म्हणून थांबलोय, नाहीतर..”; बच्चू कडूंचा रवी राणांना इशारा

मिंध्यांना वाटतं की सगळं काही पैशाने विकत घेता येतं; भरपावसात उद्धव ठाकरे कडाडले

भ्रष्टाचाराची कीड भाजपमध्ये येणार होती! ‘या’ नेत्याने केला मोठा गौप्यस्फोट

Join WhatsApp Group

Join Now