सावधान! महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; ४ जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट जारी

On: August 22, 2025 10:47 AM
Maharashtra Weather Update
---Advertisement---

Maharashtra Weather Alert | महाराष्ट्रात मान्सूनचा जोर ओसरत असला तरी काही भागांत हवामान विभागाने सतर्कतेचा इशारा दिला आहे. कोकण किनारपट्टीवर पावसाची तीव्रता अजून कायम राहणार असून, ठाणे, पालघर, रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यांसाठी भारतीय हवामान खात्याने यलो अलर्ट जारी केला आहे. दरम्यान, पुणे आणि सातारा जिल्ह्यांच्या घाटमाथा भागांसाठी ऑरेंज अलर्ट जाहीर करण्यात आला आहे. (Maharashtra Weather Alert)

मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये आज दिवसभर आकाश प्रामुख्याने ढगाळ राहणार असून ठिकठिकाणी मध्यम पावसाच्या सरी कोसळतील. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, मुंबईत कमाल तापमान 30 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 24 अंश सेल्सिअस नोंदवले जाईल. रायगड आणि रत्नागिरीतही पावसाची शक्यता असल्याने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

पुणे–सातारा घाटमाथ्यावर सतर्कतेचा इशारा :

पुणे जिल्ह्यातील घाटमाथा परिसरासाठी हवामान विभागाने यलो इशारा दिला असून, हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे. पुणे शहरात आकाश आंशिक ढगाळ राहणार असून हलक्या सरी पडतील. पुण्यातील कमाल तापमान सुमारे 28 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 22 अंश सेल्सिअस राहणार आहे.

सातार्‍यातील काही घाटमाथा भागांत मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. त्यामुळे डोंगराळ भागातील प्रवाशांनी खबरदारी घेण्याची सूचना प्रशासनाने केली आहे. (Maharashtra Weather Alert)

Maharashtra Weather Alert | इतर शहरांचा अंदाज :

छत्रपती संभाजीनगरमध्ये आज आकाश ढगाळ राहील व हलक्या सरी कोसळतील. येथे कमाल तापमान 29 अंश आणि किमान तापमान 22 अंश सेल्सिअस असेल. नाशिकमध्ये आकाश अंशतः ढगाळ राहणार असून काही ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस होईल. नाशिकचे कमाल तापमान 28 अंश आणि किमान तापमान 22 अंश असेल.

नागपूरमध्ये बहुतेक वेळा आकाश ढगाळ राहणार असून हलक्या सरींची शक्यता आहे. येथील कमाल तापमान 30 अंश आणि किमान तापमान 23 अंश सेल्सिअस नोंदवले जाईल. विशेष म्हणजे, 24 ऑगस्ट रोजी नागपूरमध्ये मेघगर्जनेसह मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. (Maharashtra Weather Alert)

पुढील काही दिवसांचा अंदाज :

हवामान विभागाच्या माहितीनुसार, कोकण किनारपट्टीवर अजून काही दिवस जोरदार पाऊस सुरू राहणार आहे. मात्र, ढगफुटीच्या घटना थांबून हळूहळू हवेत उन्हाची चाहूल लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी खबरदारी घेत राहावी आणि अधिकृत सूचना पाळाव्यात, असा सल्ला हवामान खात्याने दिला आहे.

News Title: Maharashtra Weather Forecast Today: IMD Issues Yellow Alert for Thane, Palghar, Raigad, Ratnagiri on August 22

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now