बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्वाची बातमी!

On: February 10, 2025 5:26 PM
Maharashtra State Board HSC Exam Starts Tomorrow 
---Advertisement---

HSC Exam | बारावीच्या परीक्षेला (HSC Exam) उद्यापासून (मंगळवार, 11 फेब्रुवारी 2025) सुरुवात होत आहे. यावर्षी दहा दिवस आधीच परीक्षा घेतली जात आहे. परीक्षेसाठी एकूण 15 लाख 5 हजार 37 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाचे (Maharashtra State Board) अध्यक्ष शरद गोसावी (Sharad Gosavi) यांनी पत्रकार परिषद घेऊन परीक्षेच्या तयारीबाबत माहिती दिली.

परीक्षा आणि निकालाबाबत महत्त्वाची माहिती

बारावीची परीक्षा 11  फेब्रुवारी 2025 पासून सुरू होत आहे. यावर्षी 10 दिवस आधी परीक्षा होत असल्याने, निकालही (Result) लवकर जाहीर करण्याचा प्रयत्न असेल. 15 मे पर्यंत निकाल जाहीर करण्याचा प्रयत्न असल्याचे शरद गोसावी यांनी सांगितले.

विद्यार्थी संख्या:

एकूण विद्यार्थी: 15 लाख 5 हजार 37
मुले: 8 लाख 10 हजार 348
मुली: 6 लाख 94 हजार 352
तृतीयपंथी (Transgender): 37

शाखानिहाय विद्यार्थी संख्या:

विज्ञान (Science): 7 लाख 68 हजार 967
कला (Arts): 3 लाख 80 हजार 410
वाणिज्य (Commerce): 3 लाख 19 हजार 439

परीक्षेसंबंधी महत्त्वाच्या सूचना-

सर्व परीक्षार्थ्यांना परीक्षेच्या अर्धा तास आधी केंद्रावर हजर राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
विद्यार्थ्यांना 10 मिनिटे वाढवून दिली जाणार आहेत.

परीक्षा केंद्रावर गैरप्रकार (Malpractice) घडल्यास, गैरप्रकारांना उद्युक्त करणारे आणि मदत करणाऱ्यांवर पात्र आणि अजामीनपात्र (Non-bailable) गुन्हा दाखल केला जाईल.

संवेदनशील (Sensitive) परीक्षा केंद्रांवर ड्रोन कॅमेऱ्याद्वारे (Drone Camera) निगराणी ठेवली जाईल. परीक्षा केंद्रावर गैरप्रकार आढळल्यास संबंधित केंद्राची मान्यता कायमस्वरूपी रद्द केली जाईल.

प्रश्नपत्रिका (Question Paper) फुटू नये म्हणून जीपीएससह (GPS) लाइव्ह ट्रॅकिंग (Live Tracking) आणि व्हिडिओ चित्रीकरण (Video Recording) केले जाईल, अशी माहिती आहे.

Title : Maharashtra State Board HSC Exam Starts Tomorrow 

 

Join WhatsApp Group

Join Now