नागरिकांनो काळजी घ्या! आज राज्यात पावसाचा ऑरेंज अलर्ट

On: August 6, 2026 12:14 PM
Maharashtra Rain Alert
---Advertisement---

Maharashtra Rain Alert | राज्यात पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढला असून भारतीय हवामान विभाग यांनी 6 ऑगस्ट 2026 साठी ताजे हवामान अपडेट जाहीर केले आहे. राज्यातील अनेक भागांत मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली असून काही जिल्ह्यांसाठी ऑरेंज तर काहींसाठी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. विशेषतः घाटमाथा भागातील नागरिकांनी अधिक सतर्क राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

कोकण, घाटमाथा आणि पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर :

आजच्या अंदाजानुसार रायगड (Raigad) जिल्ह्यात अतिमुसळधार पावसाची शक्यता असल्याने ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. ठाणे (Thane) आणि रत्नागिरी (Ratnagiri) येथे मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा देत यलो अलर्ट लागू करण्यात आला आहे. तर पालघर (Palghar), मुंबई (Mumbai) आणि सिंधुदुर्ग (Sindhudurg) जिल्ह्यांमध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. याशिवाय उत्तर मध्य महाराष्ट्रातील घाट परिसरात काही ठिकाणी अतिवृष्टीची शक्यता असून कोकण-गोवा तसेच दक्षिण मध्य महाराष्ट्रातील घाटमाथ्यावरही जोरदार पावसाची शक्यता कायम असल्याचे हवामान विभागाने स्पष्ट केले आहे.

नाशिक (Nashik) जिल्ह्यातील घाटमाथा भागासाठीही यलो अलर्ट देण्यात आला असून तेथे मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. धुळे (Dhule) आणि अहिल्यानगर (Ahilyanagar) येथे हलका ते मध्यम पाऊस पडू शकतो तसेच वाऱ्याचा वेग वाढण्याची शक्यता आहे. नंदुरबार (Nandurbar), जळगाव (Jalgaon) आणि नाशिक जिल्ह्यांमध्येही हलक्या स्वरूपाच्या पावसासह काही ठिकाणी वादळी वाऱ्यांचा प्रभाव जाणवू शकतो.

Maharashtra Rain Alert | मराठवाडा आणि विदर्भासाठी हवामानाचा अंदाज :

छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, बीड (Beed), लातूर (Latur) आणि धाराशिव या जिल्ह्यांमध्ये हलक्या पावसासोबत वादळी वारे वाहण्याचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे. याशिवाय नांदेड (Nanded) आणि हिंगोली (Hingoli) येथे मेघगर्जनेसह हलका ते मध्यम पाऊस पडू शकतो, असा इशाराही देण्यात आला आहे. त्यामुळे या भागातील नागरिकांनी हवामानाचा अंदाज लक्षात घेऊन आवश्यक ती खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

दुसरीकडे विदर्भ विभागातील कोणत्याही जिल्ह्यासाठी विशेष रंगाचा अलर्ट जारी करण्यात आलेला नाही. मात्र, या विभागातील काही ठिकाणी स्थानिक वातावरणामुळे अधूनमधून हलक्या पावसाच्या सरी कोसळण्याची शक्यता कायम असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे. राज्यातील बहुतांश भागात पावसाची सक्रियता कायम राहण्याची चिन्हे असल्याने विशेषतः घाट परिसरातील नागरिकांनी तसेच प्रवाशांनी सतर्कता बाळगावी, असा सल्ला प्रशासनाकडून देण्यात आला आहे.

News Title: Maharashtra Rain Alert Today

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now