Maharashtra Weather Update | राज्यात मान्सूनने पुन्हा वेग घेतला असून 1 जुलै रोजी अनेक भागांमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. (India Meteorological Department) हवामान विभागाने (Maharashtra) मधील विविध जिल्ह्यांसाठी ऑरेंज आणि यलो अलर्ट जारी करत नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. विशेषतः कोकण आणि विदर्भात अतिवृष्टीची शक्यता लक्षात घेऊन प्रशासनाने खबरदारी घेण्याचा सल्ला दिला आहे.
कोकणासह अनेक भागांमध्ये जोरदार पावसाचा अंदाज :
मान्सून सक्रिय झाल्यामुळे राज्यातील अनेक जिल्ह्यांत पावसाची तीव्रता वाढण्याची शक्यता आहे. हवामान विभागाने कोकण आणि विदर्भातील काही भागांसाठी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. त्यामुळे नागरिकांनी हवामानाचा अंदाज लक्षात घेऊनच बाहेर पडावे, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
कोकण विभागातील पालघर (Palghar) आणि सिंधुदुर्ग (Sindhudurg) जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे. तर रायगड (Raigad), रत्नागिरी (Ratnagiri), ठाणे (Thane) आणि मुंबई (Mumbai) या जिल्ह्यांमध्ये ऑरेंज अलर्ट घोषित करण्यात आला आहे. या परिसरात मुसळधार पावसामुळे सखल भागांत पाणी साचण्याची तसेच दैनंदिन जनजीवनावर परिणाम होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. उत्तर महाराष्ट्रात धुळे (Dhule), नंदुरबार (Nandurbar), जळगाव (Jalgaon), नाशिक (Nashik) आणि नाशिक घाट परिसरात हलका ते मध्यम पाऊस पडण्याचा अंदाज आहे. याशिवाय अहिल्यानगर (Ahilyanagar) जिल्ह्यासाठी यलो अलर्ट जारी करण्यात आला असून काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.
Maharashtra Weather Update | विदर्भात अतिवृष्टीचा धोका, नागरिकांना सतर्कतेचा सल्ला :
पश्चिम महाराष्ट्रातील पुणे (Pune), कोल्हापूर (Kolhapur), सातारा (Satara), सांगली (Sangli) आणि सोलापूर (Solapur) जिल्ह्यांत तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह हलका ते मध्यम पाऊस पडू शकतो. काही भागांमध्ये जोरदार सरींची शक्यता देखील हवामान विभागाने नाकारलेली नाही. मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar), जालना (Jalna) आणि परभणी (Parbhani) येथे हलका ते मध्यम पाऊस अपेक्षित असून बीड (Beed), हिंगोली (Hingoli), नांदेड (Nanded), धाराशिव (Dharashiv) आणि लातूर (Latur) जिल्ह्यांत विजांसह पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
विदर्भातील अकोला (Akola), अमरावती (Amravati) आणि बुलढाणा (Buldhana) जिल्ह्यांसाठी विजांच्या कडकडाटासह ऑरेंज अलर्ट जाहीर करण्यात आला आहे. तसेच चंद्रपूर (Chandrapur) आणि गडचिरोली (Gadchiroli) येथे मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता असल्याने पूरसदृश परिस्थिती निर्माण होऊ शकते, असा इशारा देण्यात आला आहे. गोंदिया (Gondia), नागपूर (Nagpur), वर्धा (Wardha), यवतमाळ (Yavatmal) आणि वाशिम (Washim) या जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट लागू करण्यात आला आहे. हवामान विभागाने नागरिकांना प्रवासाचे नियोजन हवामान पाहून करण्याचा सल्ला दिला असून नदी, नाले, धबधबे आणि पूरग्रस्त भागांपासून सुरक्षित अंतर राखण्याचे आवाहन केले आहे.






