उद्या राज्यात मुसळधार पावसाचा इशारा, 29 जिल्हे अलर्टवर

On: July 3, 2026 8:51 PM
Maharashtra Rain Alert
---Advertisement---

Maharashtra Rain Alert | राज्यात मान्सूनचा जोर कायम असून अनेक भागांत मुसळधार ते अतिवृष्टीचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. भारतीय हवामान विभागाने (IMD) विविध जिल्ह्यांसाठी रेड, ऑरेंज आणि यलो अलर्ट जारी केला असून नागरिकांनी आवश्यक ती खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे. विशेषतः घाटमाथा आणि किनारपट्टी भागात ढगफुटीसदृश पावसाची शक्यता असल्याने प्रशासन सतर्क झाले आहे.

रेड, ऑरेंज आणि यलो अलर्टची घोषणा :

हवामान विभागाच्या ताज्या अंदाजानुसार, मध्य महाराष्ट्रातील घाट परिसरात मेघगर्जना, विजांचा कडकडाट, ताशी 40 ते 50 किलोमीटर वेगाने वाहणारे वारे आणि काही ठिकाणी अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे. मराठवाड्यातही विजांसह मुसळधार पाऊस आणि जोरदार वाऱ्याचा इशारा देण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर शनिवारसाठी राज्यातील 29 जिल्ह्यांना विविध स्तरांचे अलर्ट जारी करण्यात आले आहेत.

मुंबई शहर (Mumbai), मुंबई उपनगर (Mumbai Suburban), ठाणे (Thane), रायगड (Raigad) आणि पालघर (Palghar) या पाच जिल्ह्यांना रेड अलर्ट देण्यात आला आहे. याशिवाय सातारा (Satara) घाट परिसर, नाशिक (Nashik) घाट परिसर आणि पुणे (Pune) घाट परिसरासाठीही रेड अलर्ट लागू करण्यात आला आहे. तर रत्नागिरी (Ratnagiri), सिंधुदुर्ग (Sindhudurg), धुळे (Dhule), नंदुरबार (Nandurbar), नाशिक, कोल्हापूर (Kolhapur) घाट परिसर, गोंदिया (Gondia), वाशिम (Washim) आणि यवतमाळ (Yavatmal) जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट जाहीर करण्यात आला आहे.

Maharashtra Rain Alert | विभागनिहाय हवामानाचा अंदाज :

यलो अलर्ट जारी करण्यात आलेल्या जिल्ह्यांमध्ये जळगाव (Jalgaon), अहिल्यानगर (Ahilyanagar), छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar), जालना (Jalna), परभणी (Parbhani), बीड (Beed), हिंगोली (Hingoli), नांदेड (Nanded), अकोला (Akola), अमरावती (Amravati), भंडारा (Bhandara), बुलढाणा (Buldhana), चंद्रपूर (Chandrapur), गडचिरोली (Gadchiroli), नागपूर (Nagpur) आणि वर्धा (Wardha) या 16 जिल्ह्यांचा समावेश आहे. या भागांमध्ये मेघगर्जनेसह पावसाच्या सरी आणि काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

विभागनिहाय अंदाजानुसार, कोकणात बहुतांश ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता असून काही भागांत जोरदार ते अतिजोरदार पाऊस, विजांचा कडकडाट आणि किनारपट्टीवर वेगवान वारे वाहण्याचा अंदाज आहे. मध्य महाराष्ट्रातही बहुतांश भागात मुसळधार पावसासह काही ठिकाणी अतिवृष्टी होऊ शकते. मराठवाड्यात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज असून विदर्भात बहुतांश भागांत पाऊस, मेघगर्जना आणि वेगवान वाऱ्यांसह काही ठिकाणी जोरदार ते अतिजोरदार पावसाची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.

News Title: Maharashtra Rain Alert for Saturday

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now