सर्वसामान्यांसाठी सर्वात मोठी गूड न्यूज! पेट्रोल-डिझेलच्या किमतीत कपात होणार?

On: July 7, 2026 7:01 PM
Fuel Price Cut
---Advertisement---

Fuel Price Cut | भारतातील वाहनधारकांसाठी दिलासादायक घडामोड समोर आली आहे. आशियाई देशांसाठी कच्च्या तेलाच्या दरात मोठी कपात करण्याचा निर्णय घेण्यात आल्यामुळे भारतातील इंधनाच्या किंमतींवर सकारात्मक परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे आगामी काळात पेट्रोल, डिझेल आणि अन्य इंधनाच्या दरांमध्ये घट होण्याची अपेक्षा वाढली आहे.

कच्च्या तेलाच्या दरात विक्रमी कपात :

जगातील आघाडीची तेल निर्यातदार कंपनी सौदी अरामको (Saudi Aramco) यांनी भारतासह आशियातील ग्राहकांसाठी ऑगस्ट महिन्यापासून कच्च्या तेलाच्या विक्रीदरात मोठी कपात जाहीर केली आहे. या निर्णयामुळे भारतासारख्या मोठ्या प्रमाणावर कच्चे तेल आयात करणाऱ्या देशांचा आयात खर्च कमी होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. परिणामी, देशांतर्गत इंधन दरांवरील आर्थिक ताणही कमी होऊ शकतो.

कंपनीने आपल्या सर्वाधिक मागणी असलेल्या अरेब लाईट (Arab Light) कच्च्या तेलाची किंमत ओमान/दुबई (Oman/Dubai) या प्रादेशिक मानकाच्या तुलनेत प्रति बॅरल 1.50 डॉलरने कमी केली आहे. जुलै महिन्याच्या तुलनेत ही जवळपास 11 डॉलर प्रति बॅरल इतकी मोठी कपात मानली जात असून 2003 नंतरची ही सर्वात मोठी दरकपात असल्याची माहिती समोर आली आहे. या निर्णयामुळे अधिकृत विक्री किंमत (OSP) जून 2020 नंतरच्या सर्वात नीचांकी पातळीवर पोहोचली आहे. यापूर्वी कोरोना काळातील लॉकडाऊनमुळे जागतिक मागणी घटल्यावरच अशा प्रकारचे दर पाहायला मिळाले होते.

Fuel Price Cut | भारताला मिळू शकतो मोठा फायदा :

भारत आपल्या गरजेपैकी बहुतांश कच्चे तेल परदेशातून आयात करतो. त्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात दर कमी झाल्यास त्याचा थेट फायदा देशाच्या आयात खर्चावर होतो. तेल स्वस्त मिळाल्यास ऑईल मार्केटिंग कंपन्यांचा खर्च कमी होतो आणि त्याचा परिणाम पुढे पेट्रोल-डिझेलच्या किरकोळ किमतींवर दिसून येण्याची शक्यता असते. त्यामुळे वाहनधारकांना मोठा आर्थिक दिलासा मिळू शकतो.

तेल कंपन्यांच्या गणितानुसार, आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमतीत प्रति बॅरल 10 डॉलरची वाढ झाल्यास भारतीय कंपन्यांना प्रति लिटर सुमारे 6 रुपयांचा अतिरिक्त भार सहन करावा लागतो. आता परिस्थिती याच्या उलट होत असल्याने कंपन्यांच्या नफ्यात वाढ होण्याची शक्यता आहे. भारताचे पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंग पुरी (Hardeep Singh Puri) यांनीही यापूर्वी संकेत दिले होते की, कच्च्या तेलाच्या किंमती युद्धपूर्व पातळीवर स्थिर राहिल्यास देशात पेट्रोल, डिझेल तसेच एलपीजी (LPG) सिलिंडरच्या दरात कपात होऊ शकते.

दरम्यान, अमेरिका (United States) आणि इराण (Iran) यांच्यात युद्धविरामाची शक्यता वाढल्याने जागतिक बाजारात कच्च्या तेलाचा पुरवठा वाढण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. त्यामुळे भविष्यात इंधनाच्या किंमतींवर आणखी सकारात्मक परिणाम होऊ शकतो.

News Title: Fuel Price Cut Likely Soon

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now