राज्यातील २१ जिल्ह्यांना ‘यलो अलर्ट’; येत्या २४ तासांत विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता

On: May 12, 2025 12:10 PM
Pune Weather Update
---Advertisement---

Weather Update | राज्यात पूर्वमोसमी पावसाने जोरदार हजेरी लावली असून, अनेक ठिकाणी वादळी वाऱ्यांसह पावसाचे सावट कायम आहे. भारतीय हवामान विभागाने (Indian Meteorological Department) (IMD) पश्चिम महाराष्ट्रासह (Western Maharashtra) राज्यातील एकूण २१ जिल्ह्यांमध्ये पुढील काही दिवसांसाठी वादळी पाऊस आणि गारपिटीचा ‘यलो अलर्ट’ (Yellow Alert) जारी केला आहे. या हवामान बदलांचा नागरिकांनी आणि विशेषतः शेतकऱ्यांनी गांभीर्याने विचार करून योग्य ती खबरदारी घेणे आवश्यक आहे.

हवामानाचा पुढील २४ तासांचा अंदाज :

कोल्हापूर (Kolhapur) जिल्ह्यात पुढील २४ तासांत कमाल तापमान ३६ अंश सेल्सिअस राहण्याचा अंदाज आहे. गेल्या काही दिवसांपासून असलेल्या ढगाळ वातावरणात आता मोठे बदल अपेक्षित असून, आज, सोमवार दुपारनंतर गारपिटीसह विजांचा कडकडाट आणि ताशी ४० ते ५० किलोमीटर वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. त्यामुळे कोल्हापूर (Kolhapur) जिल्ह्यासाठी पुढील २४ तास ‘यलो अलर्ट’ (Yellow Alert) देण्यात आला आहे.

सातारा (Satara) जिल्ह्यातही अवकाळी पावसाचे ढग कायम असून, येत्या २४ तासांत विजांच्या कडकडाटासह ताशी ४० ते ५० किलोमीटर वेगाने वारे वाहतील आणि गारपीटही होण्याची शक्यता आहे. साताऱ्यासाठी (Satara) पुढील चार दिवस ‘यलो अलर्ट’ (Yellow Alert) जारी करण्यात आला असून, नागरिकांनी दक्ष राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

हवामान बदल ‘या’ भागासाठी महत्त्वाचे ठरणार :

रविवारी, ११ मे रोजी, सांगली (Sangli) जिल्ह्यातील शिराळा (Shirala) तालुक्यात मुसळधार पावसाने हजेरी लावली होती. आता पुढील २४ तासांतील हवामान बदल या भागासाठी महत्त्वाचे ठरणार आहेत. येथेही ताशी ४० ते ५० किलोमीटर वेगाने वारे वाहण्याची शक्यता असून, दुपारनंतर विजांचा कडकडाट आणि ढगांच्या गडगडाटासह अवकाळी पावसाचे सावट आहे. यावेळी कमाल तापमान ३८ अंश सेल्सिअस, तर किमान तापमान २४ अंश सेल्सिअस राहण्याचा अंदाज आहे.

सोलापूर (Solapur) जिल्ह्यातील तापमान थोडे कमी होऊन ३७ अंश सेल्सिअसवर स्थिरावेल. सोलापुरात (Solapur) ढगाळ आकाशासह मेघगर्जना आणि विजांचा कडकडाट होण्याचा अंदाज हवामान विभागाने (IMD) वर्तवला असून, वादळी पावसाच्या शक्यतेमुळे येथेही ‘यलो अलर्ट’ (Yellow Alert) जारी करण्यात आला आहे. पुणे (Pune) जिल्ह्यात ढगाळ वातावरण कायम असून, मागील २४ तासांत ३५.४ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली. पुढील २४ तासांत पुण्यातील (Pune) तापमान ३५ अंशांवर स्थिर राहण्याची शक्यता आहे. तसेच, वादळी वाऱ्यासह तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाज असल्याने भारतीय हवामान विभागाने (IMD) ‘यलो अलर्ट’ (Yellow Alert) दिला आहे.

Weather Update | वातावरणीय प्रणाली :

पश्चिम महाराष्ट्रातील (Western Maharashtra) सरासरी कमाल तापमान ३८.९ अंश सेल्सिअसवर नोंदवले गेले आहे. सध्या पूर्व-मध्य अरबी समुद्रापासून (Arabian Sea) सौराष्ट्रापर्यंत (Saurashtra) हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे, ज्यामुळे बाष्पयुक्त वारे राज्याच्या दिशेने वाहत आहेत.

यासोबतच, मराठवाड्यापासून उत्तर अंतर्गत कर्नाटक, तामिळनाडू ते थेट मन्नारच्या आखातापर्यंत हवेचा एक दक्षिणोत्तर कमी दाबाचा पट्टा (Trough) देखील कायम आहे. या दोन्ही वातावरणीय प्रणालींच्या एकत्रित प्रभावामुळे राज्यात पूर्वमोसमी पावसासाठी अत्यंत पोषक हवामान निर्माण झाले असून, त्यामुळेच अनेक जिल्ह्यांमध्ये वादळी पावसाची शक्यता निर्माण झाली आहे.

News title : Maharashtra Pre-Monsoon Fury: Yellow Alert Issued

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now