Maharashtra Politics | लोकसभा निवडणुकीच्या (Loksabha Election) पार्श्वभूमीवर सर्वच पक्ष कामाला लागले आहेत. नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी राज्यात मोठी घडामोडी घडताना दिसत आहे. तसेच महाविकास आघाडीमध्ये (Mahavikas Aghadi) मात्र जागा वाटपावरून एकमत होत नसल्याचं पाहायला मिळत आहे.
Maharashtra Politics | महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी घडामोड
शिवसेनेचे नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी लोकसभेच्या 23 जागांवर दावा सांगितला आहे. तर, काँग्रेस नेतेसुद्धा 27 जागांवर लढण्यास ठाम आहेत. जागा वाटपांसंदर्भात काँग्रेसने नेमलेल्या पाच सदस्यीय समितीने देखील काँग्रसने महाराष्ट्रातून 27 जागांवर निवडणूक लढायला हवी, असा प्रस्ताव केंद्रीय नेत्यांना दिलाय. त्यामुळे कोणाच्या वाट्याला किती जागा येणार याची चर्चा सुरू आहे. अशात राज्याच्या राजकारणात मोठ्या हालचाली होताना दिसत आहेत.
Maharashtra Politics | उद्धव ठाकरे दिल्ली दौऱ्यावर जाणार?
ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची काँग्रेसच्या पक्षश्रेंष्ठीसोंबत जागावाटपावरून फोनवर चर्चा झाल्याची माहिती समोर आली आहे. तसेच उद्धव ठाकरे काही दिवसांसाठी दिल्लीत जाणार असल्याचं कळतंय.
उद्धव ठाकरेंचा लवकरच दिल्ली दौरा होणार. या दिल्ली दौऱ्यात जागावाटपावर चर्चा होणार आहे, अशी माहिती समोर आली आहे.
जागावाटपाबाबत आमचं मतभेद नाही, पण भाजपच्या विरोधात एकत्रित लढायचं आहे, अशी उद्धव ठाकरेंची भूमिका आहे. तसेच भाजपला पराभूत करणं महत्त्वाचं आहे, अशीदेखील भूमिका उद्धव ठाकरेंनी मांडली आहे.
इंडिया आघाडीची या महिन्यामध्ये देखील बैठक पार पडली होती. पण जागावाटपाबाबत आणखी एक बैठक दिल्लीत पार पडणार आहे. या बैठकीत जागा कशाप्रकारे लढायच्या याबाबत चर्चा होणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
Aishwarya Rai-अभिषेकच्या घटस्फोटाच्या चर्चेनंतर अमिताभ बच्चन यांचा मोठा निर्णय!
Kasganj News | ‘थंडीचा त्रास होतोय, मला बायको हवीये…’; तरूणाने थेट पोलीस स्टेशन गाठलं
Weather Update | ‘या’ भागात पावसाची शक्यता, हवामान विभागाचा महत्त्वाचा इशारा
David Warner ने आपल्या चाहत्यांना दिला धक्का; घेतला ‘हा’ मोठा निर्णय
Central government employees | नवीन वर्षाची धमाकेदार सुरुवात; सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी






