तुमच्या शहरात कोणी बाजी मारली? पाहा विजयी नगरसेवकांची अपडेटेड लिस्ट!

On: December 21, 2025 11:45 AM
Nagarsevak Winner List 2025
---Advertisement---

Nagarsevak Winner List 2025 | महाराष्ट्रातील नगरपरिषद, नगरपंचायत निवडणुकांची मतमोजणी आज सकाळी १० वाजल्यापासून सुरू झाली असून राज्यभरातील विजयी नगरसेवकांची यादी हळूहळू समोर येत आहे. 287 नगरपरिषद व नगरपंचायतींसाठी ही मतमोजणी होत असून, अनेक ठिकाणी महायुती आणि महाविकास आघाडीतील पक्ष एकमेकांविरोधात थेट लढले. त्यामुळे या निकालांकडे केवळ स्थानिक राजकारणापुरते न पाहता आगामी विधानसभा निवडणुकांची नांदी म्हणून पाहिले जात आहे.

जामनेर, अंजनगाव आणि दोंडाईचा या तीन नगरपंचायतींमध्ये भाजपचे सर्व उमेदवार बिनविरोध निवडून आल्याने भाजपचा आत्मविश्वास अधिक वाढला आहे. कोकण, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील अनेक ठिकाणी वेगवेगळ्या पक्षांना यश मिळाले असले, तरी एकूणच राज्यात राजकीय चित्र रंगतदार बनले आहे. निकाल येत असतानाच विजयी नगरसेवकांची यादी सातत्याने अपडेट होत आहे.

कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील निकाल :

कोकण विभागातील वेंगुर्ले नगरपरिषदेत शिंदे गटाच्या लीना समीर म्हापणकर यांच्यासह भाजपचे रवींद्र रमाकांत शिरसाट, गौरी माईनकर, प्रीतम सावंत, विनायक गवंडकर, गौरी मराठे, आकांक्षा परब आणि तातोबा पालयेकर हे उमेदवार विजयी झाले आहेत. सावंतवाडी नगरपरिषदेत भाजपच्या दिपाली भालेकर, सुधीर आडीवरेकर, दुलारी रांगणेकर, आनंद नेवगी, सुनिता पेडणेकर, मोहिनी मडगावकर यांच्यासह काँग्रेसचे तौकीर शेख, शिंदे गटाच्या सायली दुभाषी आणि खेमराज कुडतरकर, तर ठाकरे गटाचे देवेंद्र टेमकर विजयी झाले आहेत.

सातारा नगरपालिकेत अपक्ष उमेदवार मयूर कांबळे आणि जयश्री जाधव यांनी विजय मिळवला आहे. सासवड नगरपरिषदेत प्रभाग क्रमांक २ मधून दिनेश भिंताडे आणि लिना वढणे, तर प्रभाग क्रमांक ९ मधून प्रदीप राऊत आणि प्रियंका जगताप हे भाजपचे उमेदवार विजयी झाले आहेत. चंदगड नगरपंचायतीत राजर्षी शाहू विकास आघाडीचे सहा उमेदवार विजयी झाले असून भाजप–शिवसेना युतीचे तीन उमेदवार निवडून आले आहेत.

Nagarsevak Winner List 2025 | मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भातील चित्र :

पालघर जिल्ह्यातील जव्हार नगरपरिषदेत भाजपचे तीन, शिवसेना शिंदे गटाचा एक आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचा एक नगरसेवक विजयी झाला आहे. रहिमतपूरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे सात आणि भाजपचे तीन उमेदवार निवडून आले आहेत. मुरगुड नगरपरिषदेत शिवसेना शिंदे गटाचे तब्बल 16 नगरसेवक विजयी झाले असून राष्ट्रवादी काँग्रेसला केवळ चार जागांवर समाधान मानावे लागले आहे.

करमाळ्यात शहर विकास आघाडीच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार मोहिनी संजय सावंत विजयी झाल्या आहेत. शिराळा नगरपंचायतीत भाजप आणि शिवसेनेचे चार उमेदवार निवडून आले असून दोन्ही राष्ट्रवादी गटांना केवळ एका जागेवर यश मिळाले आहे. मैंदर्गी नगरपरिषदेत भाजपचे आठ आणि स्थानिक गटाचे दोन नगरसेवक विजयी झाले आहेत.

काँग्रेसला एकही जागा जिंकता आली नाही :

बार्शी नगरपरिषदेत भाजपचे पाच, तर शिवसेना (ठाकरे गट) चे तीन नगरसेवक विजयी झाले आहेत. औसा नगरपरिषदेत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाने मोठा विजय मिळवत 23 पैकी 17 जागांवर ताबा मिळवला असून भाजपला सहा जागा मिळाल्या आहेत. काँग्रेसला एकही जागा जिंकता आली नाही. येथे नगराध्यक्षपदाच्या उमेदवार परवीन नवाबुद्दीन शेख यांनी साडेचारशे मतांनी विजय मिळवला आहे. (Maharashtra Nagarsevak Winner List 2025)

आटपाडी नगरपंचायतीत भाजप सहा, शिंदे गट सात आणि राष्ट्रवादी एका जागेवर विजयी झाले आहेत. जेजुरी नगरपरिषदेत भाजपचे दोन उमेदवार आणि अपक्ष तानाजी खोमणे विजयी झाले आहेत. खेड नगरपरिषदेत एकूण 21 पैकी 18 जागांवर शिवसेना आणि तीन जागांवर भाजप विजयी झाले असून माधवी बुटाला या शिवसेनेच्या नगराध्यक्षपदी निवडून आल्या आहेत.

News Title : Maharashtra Nagarsevak Winner List 2025: Full City-wise List from Konkan to Marathwada, Vidarbha and Western Maharashtra

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now