Ahilyanagar : महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेला (Maharashtra Kesari Kusti Spardha) गालबोट लागले आहे. गादी विभागाच्या उपांत्य फेरीत नांदेडचा शिवराज राक्षे (Shivraj Rakshe) याचा पुण्याच्या पृथ्वीराज मोहोळने (Prithviraj Mohol) पराभव केल्यानंतर राक्षेने पंचांच्या निर्णयावर नाराजी व्यक्त करत त्यांना लाथ मारल्याचा धक्कादायक प्रकार घडला. यानंतर गोंधळ उडाला.
“मी डबल महाराष्ट्र केसरी (Double Maharashtra Kesari) आहे, तिसऱ्यांदा होणार होतो, माझ्यावर अन्याय झाला,” असा आरोप राक्षेने केला आहे.
उपांत्य फेरीचा सामना आणि राक्षेचा संताप
अहिल्यानगरीत सायंकाळी सात वाजता नांदेडचा डबल महाराष्ट्र केसरी शिवराज राक्षे आणि पुण्याचा पृथ्वीराज मोहोळ यांच्यात उपांत्य फेरीचा सामना सुरू होता. या सामन्यात राक्षेचा पराभव झाल्याचे जाहीर केल्यानंतर राक्षे संतापला आणि त्याने थेट पंचांनाच लाथ मारली. एवढेच नाही तर त्याने पंचांची कॉलरही पकडली होती. या प्रकारानंतर पोलिसांना हस्तक्षेप करत हे भांडण सोडवावे लागले.
राक्षेची ‘रिव्ह्यू’ची मागणी, अजित पवारांचा (Ajit Pawar) मध्यस्थीचा प्रयत्न
या प्रकारानंतर शिवराज राक्षेने कुस्तीचा रिव्ह्यू दाखवण्याची मागणी केली. “माझे खांदे आणि पाठ टेकलेली असेल तर मी स्वतःच कुस्ती सोडून बाहेर पडतो,” असे राक्षेने म्हटले आहे. या प्रकरणात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न केला.
काका पवार (Kaka Pawar) यांची प्रतिक्रिया
“दोन्ही मुले आमचीच आहेत. पंचांनी जर निकाल चुकीचा दिला असेल तर राग येऊ शकतो. त्याचे वर्ष वाया गेले ना? वर्षभर तयारी केलेली असते, त्या रागातून असे घडू शकते. जर त्याचे खांदे टेकले नसतील आणि पाठ टेकली नसेल तर असे घडू शकते,” असे ज्येष्ठ कुस्ती प्रशिक्षक (Wrestling Coach Kaka Pawar) काका पवार यांनी म्हटले आहे.
महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेकडे सर्वांचे लक्ष-
अहिल्यानगरीत महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेची अंतिम लढत (Final) होती. यंदा महाराष्ट्र केसरी – 2025 चा (Maharashtra Kesari 2025) मानकरी कोण होणार याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले होते. महाराष्ट्र कुस्तीगीर संघाच्या (Maharashtra Kustigir Sangh) वतीने आमदार संग्राम जगताप यांनी या स्पर्धेचे आयोजन केले होते.
या स्पर्धेसाठी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, विधान परिषदेचे सभापती राम शिंदे (Ram Shinde), केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ (Murlidhar Mohol), क्रीडामंत्री दत्तात्रय भरणे (Dattatray Bharne), जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) आदी नेते उपस्थित होते.
English Title: Maharashtra-Kesari-Wrestling-Competition-Shivraj-Rakshe-Kicks-Referee






