बदलत्या वातावरणामुळे नागरिकांचा ताप वाढणार; कुठं पावसाचा इशारा तर कुठं उष्णतेची लाट कायम

On: May 2, 2024 1:37 PM
Maharashtra Weather
---Advertisement---

Maharashtra Weather l गेल्या काही महिन्यांपासून देशासह राज्यातील तापमानात मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. अशातच आता गेल्या दोन आठवड्यात हवामानात बदल झाल्याने तापमान वाढत चाललं आहे. या बदलत्या हवामानामुळे नागरिक देखील त्रस्त झाले आहेत. अशातच आता हवामान विभागाने महाराष्ट्रातील वाढत्या तापमानाच्या पार्श्वभूमीवर महत्वपूर्ण अंदाज वर्तवला आहे.

कोकणात उष्णतेची लाट तर मराठवाड्यात अवकाळी पावसाचे संकट :

गेल्या दोन दिवसांपासून देशासह महाराष्ट्रातील विविध भागातील तापमानात प्रचंड वाढ झाली आहे. हवामान खात्याने अनेक भागात उष्णतेच्या लाटेचा इशारा देखील दिला आहे. त्यामुळे नागरिकांनी भरउन्हात दुपारच्या वेळी घराबाहेर पडताना काळजी घेण्याचं आवाहन हवामान विभागाकडून करण्यात आलं आहे. तसेच वाढत तापमान असतानाही मराठवाड्यसह विदर्भात पुढील 24 तासांत अवकाळी पावसाची दाट शक्यता वर्तवली आहे.

हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार पुढील 24 तासात कोकण, मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भाच्या काही जिल्ह्यांमध्ये कुठं अवकाळी पाऊस हजेरी लावणार आहे तर कुठे उष्णतेचं संकट कायम राहणार आहे. कोकण विभागातील काही भागात उष्णतेची लाट आणि दमट हवामान राहण्याची शक्यता वर्तवली आहे. तर मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये तापमानात वाढ होण्याची दाट शक्यता आहे. तर मराठवाडा आणि विदर्भात विजांच्या कडकडाटासह वादळ आणि हलका अवकाळी पाऊस पडण्याची शक्यता आहे.

Maharashtra Weather l मुंबई, ठाणेसह कोकणात जीवाची लाहीलाही होणार :

वाढत्या तापमानामुळे नागरिक त्रस्त झाले असतानाच मे महिना अत्यंत महत्वाचा ठरणार आहे. मे महिन्यात कोकणातील काही भागात उष्ण आणि दमट परिस्थिती राहणार आहे. तर मुंबई, ठाणेसह कोकणात उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे.

पुढील 24 तासांत मुंबई शहर आणि उपनगरात आकाश निरभ्र राहणार आहे. तसेच तेथील कमाल आणि किमान तापमान अनुक्रमे 34 अंश सेल्सिअस आणि 36 अंश सेल्सिअसच्या आसपास असणार आहे. दिवसेंदिवस वाढत चाललेल्या तापमानामुळे नागरिक देखील हैराण झाले आहेत. त्यामुळे नागरिकांनी भर दुपारी घराबाहेर न पाडण्याचे आवाहन हवामान विभागाकडून करण्यात आले आहे.

News Title – Maharashtra Heat Wave Weather Updates

महत्त्वाच्या बातम्या

वाद चिघळला; ‘हा’ नेता म्हणतोय… तर शरद पवार 84 वर्ष जगले नसते

अभिषेक बच्चनमुळे ‘ही’ अभिनेत्री गेली होती डिप्रेशनमध्ये; धक्कादायक कारण समोर

देवेंद्रजी तुम्ही कशाला त्यांना सोबत घेताय? ‘या’ बड्या नेत्यानी केली नम्रपणे विनंती

विद्यार्थ्यांनो… दहावीनंतर पुढे प्रवेश घेण्यासाठी ‘या’ पर्यायांचा विचार करा

राजकारण तापलं; देवेंद्र फडणवीसांनी उद्धव ठाकरेंना दिला इशारा

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now