कोण आघाडीवर कोण पिछाडीवर?, निकालाची प्रत्येक अपडेट पाहा एका क्लिकवर

On: November 23, 2024 9:58 AM
Maharashtra Assembly Results 2024
---Advertisement---

Maharashtra Assembly Election Results 2024 | आज 23 नोव्हेंबररोजी सकाळपासूनच मतमोजणीला सुरुवात झाली आहे. राज्यात महाविकास आघाडी विरोध महायुती असा थेट सामना झाला असून यात कोण बाजी मारणार याचा निकाल आज जाहीर होत आहे. त्यामुळे सर्वांचंच लक्ष आता निकालाकडे असणार आहे. यावेळी विधानसभा निवडणुकीसाठी एकूण 3 कोटी 34 लाख 37 हजार 57 पुरुषांनी तर 3 कोटी 6 लाख 49 हजार 318 महिलांनी आणि 1,820 अन्य जणांनी मतदान केलं आहे. (Maharashtra Assembly Election Results 2024)

राज्यातील 288 विधानसभा मतदारसंघांचा निकाल आज जाहीर होत आहे. यावेळी लाडक्या बहीण कोणत्या भावाला निवडून आणणार ते पाहणं उत्सुकाचं ठरणार आहे. यावेळी बंडखोर उमेदवारांच्या निकालाकडेही सर्वांचं लक्ष असेल. आज सकाळी 8 वाजेपासून विधानसभा निवडणुकीची मतमोजणी सुरू झाली असून सध्या हाती आलेल्या कलनुसार भाजपा आघाडीवर असल्याची माहिती मिळत आहे.  सातारामध्ये शिवेंद्रराजे भोसले आणि नागपूर दक्षिण पश्चिममधून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आघाडीवर आहेत.

सध्या महायुती 130 जागांवर आघाडीवर आहे तर महाविकास आघाडी 89 जागांवर आघाडीवर आहे. ईव्हीएम मतमोजणीला आता सुरुवात झाली आहे.

1. बारामती : बारामतीमध्ये पवार विरुद्ध पवार असा सामना झाला. सध्या पहिल्या फेरीत अजित पवार हे आघाडीवर दिसून येत आहेत. तर, शरद पवार गटाचे उमेदवार युगेंद्र पवार पिछाडीवर दिसून येत आहेत.

2. इंदापूर : बारामतीच्या शेजारीच असलेल्या इंदापूरमध्ये यंदा राष्ट्रवादीचे आमदार दत्तात्रय भरणे यांना शरद पवार गटाकडून माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांचे आव्हान आहे.  येथून दत्तात्रय भरणे हे आघाडीवर दिसून येत आहेत.

3. कोपरी-पाचपाखाडी : ठाण्यातील या मतदारसंघातून स्वत: राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे निवडणूक रिंगणात असून त्यांच्याविरोधात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने केदार दिघे यांना उमेदवार दिली आहे. या मतदारसंघातील निकालाची उत्सुकता आहे. येथे पहिल्या फेरीत मुख्यमंत्री शिंदे आघाडीवर आहेत. Maharashtra Assembly Election Results 2024

4. शिरूर : या विधानसभा मतदारसंघामध्ये महाविकास आघाडी कडून अशोक पवार तर राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून येथे माऊली कटके निवडणुकीच्या रिंगणात आहेत. येथे माऊली कटके हे सध्या आघाडीवर दिसून येत आहेत.

5. माहीम : माहीममधून सध्या आमित ठाकरे हे पहिल्या आणि दुसऱ्या फेरीत आघाडीवर दिसून येत आहेत.

News Title : Maharashtra Assembly Election Results 2024

महत्वाच्या बातम्या – 

‘या’ 35 बंडखोरांचा निकाल करणार गेम?, महायुती-मविआची चिंता वाढली

पश्चिम महाराष्ट्रात कोण उधळणार विजयी गुलाल?, जाणून घ्या एका क्लिकवर

शनिदेवाच्या कृपेने आज ‘या’ राशींना राजकारणात मिळणार मोठं यश!

मतदान होताचं सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री! CNG च्या दरात वाढ

योग्य न्याय मिळाला नाही!, मुंबईतील बड्या भाजप नेत्याचा ठाकरे गटात प्रवेश

Join WhatsApp Group

Join Now