मतदान होताचं सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री! CNG च्या दरात वाढ

On: November 22, 2024 5:14 PM
CNG Price Hike in Pune
---Advertisement---

CNG Price Hike l राज्यात विधानसभेचं मतदान पार पडताच सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री बसली आहे. कारण CNG गॅसच्या दरात वाढ झाली आहे. यावेळी महानगर गॅस कंपनीने आपल्या दरात वाढ करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आजपासून CNG चे नवे दर काय आहेत हे जाणून घेऊयात…

CNG चे नवे दर कधीपासून लागू? :

महानगर गॅस लिमिटेडने सीएनजीच्या दरात प्रति किलो 2 रुपयांनी वाढ करण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे आता पुण्यामध्ये सीएनजीच्या दरात प्रति किलो 2 रूपयांची वाढ झाली आहे. आजपासून म्हणजेच (22 नोव्हेंबर) पासून CNG चे नवे दर लागू झाले आहेत.

मात्र सध्या मुंबई आणि परिसरात सीएनजीचा दर हा 77 रुपये प्रति किलो झाला आहे. परंतु, या दर वाढीमुळे सीएनजीवर चालणाऱ्या वाहन चालकांना आता जास्त पैसे मोजावे लागणार आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा पुणेकरांच्या खिशावर अधिकचा भार पडणार आहे.

CNG Price Hike l वाहनधारकांच्या खिशाला कात्री लागणार? :

दरम्यान, विधानसभा निवडणूक झाल्यानंतर सीएनजीचे दर वाढल्याने नागरिक संताप व्यक्त करत आहेत. कारण आता सीएनजी वाहनधारकांच्या खिशाला कात्री लागणार आहे, त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांचं बजेट कोलमडणार आहे. तसेच CNG वरती चालणाऱ्या ऑटोरिक्षा आणि टॅक्सी चालकांच्या खर्चात मोठी वाढ झाल्याने भाडे वाढण्याची शक्यता आहे.

याशिवाय वाढत्या महागाईमुळे त्रस्त झालेल्या सर्वसामान्य ग्राहक आणि व्यावसायिकांसमोर पुन्हा एक आव्हान समोर आलं आहे. कारण आता सीएनजी गॅस 2 रुपयांनी महाग झाला आहे. तसेच आधी सीएनजीचा दर 75 रुपये प्रति किलो होता. मात्र आता तो दर 77 रुपये प्रति किलो झाला आहे.

News Title – CNG Price Hike

महत्त्वाच्या बातम्या-

योग्य न्याय मिळाला नाही!, मुंबईतील बड्या भाजप नेत्याचा ठाकरे गटात प्रवेश

सत्तेसाठी खटपट सुरु; निकालापूर्वीचं महायुतीने ‘प्लॅन बी’ आखला

…तर मनोज जरांगेंना पुन्हा उपोषण करण्याची वेळ येणार नाही

‘राज’पुत्र अमित ठाकरे आमदार बनणार?, माहीममध्ये यंदा कोण मारणार बाजी?

महाराष्ट्रातील ‘हे’ मतदारसंघ ठरू शकतात जायंट किलर!

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now