Ashram School Recruitment | महाराष्ट्रातील आदिवासी भागातील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळावे आणि शिक्षकांच्या रिक्त पदांची भर पटकन करावी, यासाठी आदिवासी विकास विभागाने मोठी भरती जाहीर केली आहे. राज्यातील शासकीय आश्रमशाळांसाठी 2025 मध्ये तब्बल 661 शिक्षक पदांची भरती जाहीर झाली असून या भरतीमुळे संस्थांतील शैक्षणिक कामकाजाला मोठी गती मिळणार आहे. या भरतीची राज्यभरात उत्सुकता असून शिक्षक भरतीची तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी ही मोठी संधी आहे. (Ashram School Recruitment)
ही भरती पूर्णपणे कंत्राटी तत्त्वावर करण्यात येणार असून तीन स्वतंत्र विभागांत – कला शिक्षक, क्रीडा शिक्षक आणि संगणक शिक्षक ही पदे भरण्यात येणार आहेत. उमेदवारांना आगामी शैक्षणिक वर्षासाठी संधी मिळणार असून, कामगिरी समाधानकारक असल्यास पुढील नूतनीकरणाची शक्यताही आहे. त्यामुळे दीर्घकालीन अनुभव मिळवू इच्छिणाऱ्या तरुणांसाठी ही भरती उपयुक्त आहे.
तीन विभागांमध्ये 661 पदांची संधी :
आदिवासी विकास विभागाने प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीनुसार, राज्यातील सर्व जिल्ह्यांतील शासकीय आश्रम शाळांसाठी 661 पदे कंत्राटी तत्त्वावर भरण्यात येतील. या भरतीसाठी 15 नोव्हेंबर 2025 पासून अर्ज प्रक्रिया सुरू झाली असून 24 नोव्हेंबर 2025 ही अर्ज करण्याची अंतिम तारीख आहे. उमेदवारांनी या कालावधीत सर्व कागदपत्रे सादर करून अर्ज दाखल करणे आवश्यक आहे. (Ashram School Recruitment)
ही सर्व पदे राज्यभर लागू असून जिल्हा किंवा तालुक्यानुसार उमेदवारांनी इच्छित स्थळाचा स्पष्ट उल्लेख अर्जात करणे बंधनकारक आहे. शाळांतील वाढत्या कामकाज आणि शिक्षकांच्या कमतरतेमुळे ही भरती अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे.
Ashram School Recruitment | पदनिहाय पात्रता आणि पगार :
भरतीत कला शिक्षकांना 20,000 रुपये, क्रीडा शिक्षकांना 25,000 रुपये, तर संगणक शिक्षकांना 20,000 रुपये इतके मासिक मानधन मिळणार आहे. ही रक्कम कंत्राटी पद्धतीनुसार देण्यात येणार असून निवडीनंतरच्या कामगिरीवर पुढील करार अवलंबून राहणार आहे. (Ashram School Recruitment)
कला शिक्षक पदासाठी ATD (Art Teacher Diploma) आवश्यक असून MA, BFA तसेच नृत्य, संगीत किंवा गायन क्षेत्रातील पदवीधारकांनाही संधी आहे. क्रीडा शिक्षक पदांसाठी उत्कृष्ट खेळाडू, माजी सैनिक, माजी पोलीस कर्मचारी तसेच NIS, B.P.Ed किंवा M.P.Ed पात्रता असलेल्यांना प्राधान्य दिले जाईल. संगणक शिक्षक पदांसाठी B.Sc.(CS/IT), BCA, BE/B.Tech Computer किंवा MCA/M.Sc.(IT/CS) अशी तांत्रिक शैक्षणिक पात्रता आवश्यक आहे.
अर्ज प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाइन :
या भरतीची संपूर्ण अर्ज प्रक्रिया ऑनलाइन पद्धतीने केली जाणार आहे. उमेदवारांनी आपला अर्ज, शैक्षणिक कागदपत्रे, अनुभव प्रमाणपत्रे आणि वैयक्तिक तपशील PDF स्वरूपात तयार करावा. हा PDF जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून 10 दिवसांच्या आत [email protected] या ई-मेलवर पाठवावा. तसेच अर्जात इच्छित तालुका/जिल्हा आणि पदाचा स्पष्ट उल्लेख करणे अत्यावश्यक आहे. अपूर्ण किंवा चुकीचा अर्ज स्वीकारला जाणार नाही. तसेच भरती प्रक्रियेबद्दल अधिक माहिती हवी असल्यास उमेदवारांनी सकाळी 10 ते संध्याकाळी 6 या वेळेत खालील क्रमांकांवर संपर्क साधू शकतात:
8956407302
9096777194
विभागाकडून वेळोवेळी जारी करण्यात येणाऱ्या सूचनांचे पालन केल्यास अर्ज प्रक्रियेत त्रुटी टाळता येतील. आश्रम शाळांमधील शैक्षणिक सुधारणा आणि डिजिटल सुविधा वाढवण्यासाठी ही भरती महत्वपूर्ण ठरणार असल्याचे मानले जात आहे.






