‘आता 48 तासांचा अल्टिमेटम देण्यापेक्षा…’; नाशिकच्या महंतांची शरद पवारांवर टीका

On: December 7, 2022 3:43 PM
---Advertisement---

नाशिक | महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद पुन्हा एकदा उफाळून आला आहे. या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना इशारा दिला होता.

24 तासात हल्ले थांबवा अन्यथा पुढच्या 48 तासांमध्ये मला बेळगावमध्ये नागरिकांना धीर द्यायला जावं लागेल, असं शरद पवार म्हणाले होते. आता यावरून नाशिकच्या महंतांनी शरद पवारांवर टीकास्त्र सोडलं आहे.

नाशिकचे महंत नचिकेत शास्त्री जोशी यांनी शरद पवारांवर खोचक टीका केली आहे. त्यांनी शरद पवारांना दत्त उपासना करण्याचं आवाहन केलं आहे. ते नाशिकमध्ये बोलत होते.

नाशिकचे (Nashik) महंत अनिकेत शास्त्री जोशी यांनी शरद पवारांवर खोचक टीका केली आहे. शरद पवार हे ज्येष्ठ नेते असून त्यांनी एकदा नव्हे तर दोनदा मुख्यमंत्री पद भूषवलेलं आहेत. त्याचबरोबर केंद्रातील अनेक उच्च पदे त्यांनी भूषाविलेली आहेत, अशी आठवण महंतांनी शरद पवारांना करून दिली.

महाराष्ट्र कर्नाटक प्रश्नी 48 तासांचा अल्टिमेटम दिला, अन सीमा प्रश्न सोडवण्याची मागणी केली. मात्र शरद पवार यांची पन्नास वर्षाची कारकीर्द ही राजकारणाशी संबंधित आहे, तर 40-50 वर्षांमध्ये हा प्रश्न त्यांनी सोडवला नाही आणि ते आता 48 तासाचे मुदत देत आहेत, हे कोणत्या तत्वात बसते, असा सवाल शास्त्री यांनी केला आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

Babita Durande

Babita Durande

Join WhatsApp Group

Join Now