“भर सेटवर माधूरी दिक्षीतला ब्लाऊज काढण्यास…”, सुप्रसिद्ध दिग्दर्शकाचा गौप्यस्फोट!

On: May 15, 2025 6:26 PM
Madhuri dixit
---Advertisement---

Madhuri Dixit | बॉलिवूडमध्ये आपल्या अभिनय आणि नृत्यामुळे शिखरावर पोहोचलेली माधुरी दीक्षित (Madhuri Dixit) ही ८०च्या दशकापासून इंडस्ट्रीवर राज्य करत आहे. अनेक ब्लॉकबस्टर चित्रपटांमध्ये तिने अभिनय करत आपलं नाव कायमच उजळलं आहे. मात्र, यशस्वी करिअर असूनही तिच्या वाट्याला काही त्रासदायक अनुभव आले आहेत. अशाच एका प्रसंगात केवळ ब्लाऊज काढण्यास नकार दिल्यामुळे तिला एका चित्रपटातून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला होता.

चित्रपटात अर्धवस्त्र दृश्यावरून वाद –

१९८९ साली दिग्दर्शक टिन्नू आनंद (Tinnu Anand) यांनी ‘शनाख्त’ (Shanakht) या चित्रपटासाठी अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) आणि माधुरी दीक्षित (Madhuri Dixit) यांची प्रमुख भूमिका म्हणून निवड केली होती. मात्र, या चित्रपटातील एका दृश्यासाठी त्यांनी माधुरीला केवळ ब्रा घालून अभिनय करावा लागेल असं स्पष्ट सांगितलं. हे दृश्य कोणत्याही गोष्टीआड लपवण्याची गरज नाही, असंही त्यांनी ठामपणे सांगितलं.

 

View this post on Instagram

 

A post shared by Madhuri Dixit (@madhuridixitnene)

या दृश्यात ती एका पुरुष पात्राला मदत करत असल्यामुळे तिचं ब्रा परिधान केलेलं रूप दाखवणं आवश्यक आहे, असं दिग्दर्शकाचं मत होतं. माधुरीने (Madhuri Dixit) त्यावेळी या दृश्यासाठी सहमती दर्शवली. टिन्नू आनंद दिलेल्या एका मुलाखतीत या घटनेचा उल्लेख केला. त्यांनी स्पष्ट सांगितलं की, माधुरीला आपली सोयीनुसार ब्रा डिझाइन करण्याची मुभा देण्यात आली होती आणि हे शूटिंग पहिल्याच दिवशी पार पडणार होतं.

माधुरीच्या नकारामुळे दिग्दर्शक भडकला-

शूटिंगसाठी सर्व तयारी झाल्यावर माधुरी अचानक त्या दृश्यासाठी तयार नसल्याचं सांगत ड्रेसिंग रूममधून बाहेरच आली नाही. तब्बल ४५ मिनिटांनी टिन्नू आनंद तिथे पोहोचले असता माधुरीने स्पष्टपणे हे दृश्य करण्यास नकार दिला. या अनपेक्षित निर्णयामुळे दिग्दर्शक चांगलाच संतापला. त्याने तिला समजावण्याचा प्रयत्न केला पण माधुरी आपल्या भूमिकेवर ठाम राहिली.

त्यामुळे रागाच्या भरात टिन्नू आनंद यांनी तिला चित्रपटातून काढून टाकलं आणि सेटवरून निघून जाण्यास सांगितलं. या घटनेनंतर सेटवर पोहोचलेल्या अमिताभ बच्चन यांनी परिस्थिती जाणून घेतली आणि समेट घडवण्याचा प्रयत्न केला. मात्र, माधुरी निर्णयावर ठाम होती. टिन्नू आनंद यांचं म्हणणं होतं की जर तिला काही आक्षेप होते, तर ते चित्रपट साइन करण्याआधीच व्यक्त करायला हवे होते.

News Title – Madhuri Dixit Fired Over Bold Scene Refusal

Mrudula Jogdand

Mrudula Jogdand

Join WhatsApp Group

Join Now