आज दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध लखनौ सुपर जायंट्स हे संघ भिडणार; कोण बाजी मारणार?

On: April 12, 2024 9:09 AM
LSG vs DC Team Prediction
---Advertisement---

LSG vs DC Team Prediction l आयपीएल 2024 चा हंगाम दिवसेंदिवस रोमांचक होत आहे. अशातच आज लखनौ सुपर जायंट्स आणि दिल्ली कॅपिटल्स या संघांमध्ये लढत होणार आहे. हा सामना आज एकाना स्टेडियमवर होणार आहे. केएल राहुलच्या नेतृत्वाखालील लखनौ सुपर जायंट्सची स्थिती अजूनही चांगली आहे, पण ऋषभ पंतच्या नेतृत्वाखाली दिल्लीची स्थिती अत्यंत वाईट आहे.

दिल्ली कॅपिटल्ससाठी हा सामना महत्त्वाचा :

लखनौ सुपर जायंट्स हा संघ तिसऱ्या क्रमांकावर आहे. संघाने चारपैकी तीन सामने जिंकले आहेत. तर दिल्ली कॅपिटल्सचा संघ आयपीएल 2024 मध्ये चांगली कामगिरी करू शकला नाही. या संघाने पाच सामने खेळले असून त्यापैकी चार सामन्यात संघाचा पराभव झाला आहे. अशा परिस्थितीत दिल्ली कॅपिटल्ससाठी हा सामना खूप महत्त्वाचा आहे.

एकाना स्टेडियमची खेळपट्टी ही फिरकीपटूंसाठी फायदेशीर असल्याचे म्हणले जाते. या स्टेडिअमवर फिरकीपटू आपली जादू दाखवताना दिसतात. वेगवान गोलंदाजांनी सुरुवातीला दडपण निर्माण केले नाही, तर फलंदाज मोठ्या धावा करू शकतात, परंतु त्यांना प्रतिस्पर्धी संघाच्या फिरकीपटूंपासून निश्चितच दूर राहावे लागेल.

LSG vs DC Team Prediction l दोन्ही संघाने संभाव्य शिलेदार :

लखनौ सुपर जायंट्स : क्विंटन डी कॉक, केएल राहुल, देवदत्त पडिक्कल, मार्कस स्टोइनिस, निकोलस पूरन, आयुष बडोनी, कृणाल पंड्या, रवी बिश्नोई, यश ठाकूर, नवीन-उल-हक, मोहसीन खान/अर्शद खान, एम. सिद्धार्थ

दिल्ली कॅपिटल्स : डेव्हिड वॉर्नर, पृथ्वी शॉ, अभिषेक पोरेल, ऋषभ पंत, जेक फ्रेझर-मॅकगर्क, ट्रिस्टन स्टब्स, ललित यादव, प्रवीण दुबे, अक्षर पटेल, इशांत शर्मा, ॲनरिक नॉर्टजे/लिझाद विल्यम्स, खलील अहमद

News Title : LSG vs DC Team Prediction

महत्त्वाच्या बातम्या-

सिनेसृष्टीत शोककळा! साखरपुड्याच्या दिवशी प्रसिद्ध अभिनेत्याचं निधन

RCB कोमात MI जोमात; बुमराह, इशान आणि सूर्यकुमार यांनी दाखवली आपली जादू

ह्युंदाई कंपनीने ग्राहकांना दिली आनंदाची बातमी; जबरदस्त मॉडेलसह नवीन व्हेरियंट लाँच

या राशीच्या व्यक्तींना शेअर मार्केटमध्ये यश मिळेल

‘पुण्यात भाऊ, तात्या नाहीतर अण्णाच निवडून येणार’; एकनाथ शिंदेंना विश्वास

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now