घरगुती गॅस वापरणाऱ्या ग्राहकांसाठी महत्वाची बातमी! ‘ही’ सेवा बंद होणार?

On: April 21, 2025 3:36 PM
LPG Strike Warning
---Advertisement---

LPG Strike Warning l घरगुती गॅस (LPG Gas) वापरणाऱ्या ग्राहकांसाठी एक महत्वाची बातमी आहे. लवकरच LPG सिलिंडर घरपोच सेवा विस्कळीत होण्याची शक्यता आहे. कारण, LPG वितरक संघटनेने केंद्र सरकारला संपाचा इशारा दिला आहे. मागण्या तीन महिन्यांत मान्य न झाल्यास, संघटना देशभरात प्रदीर्घ संपावर जाणार आहे. (LPG Strike Warning)

कमिशन वाढीसाठी आक्रमक भूमिका :

LPG डिस्ट्रीब्युटर्स युनियनने पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाला पत्र लिहून मागण्या मांडल्या आहेत. त्यामध्ये वितरकांना मिळणारे कमिशन किमान 150 रुपये प्रति सिलिंडरपर्यंत वाढवावे, अशी प्रमुख मागणी आहे. सध्या मिळणारे कमिशन अत्यंत कमी असून, ऑपरेटिंग खर्चाशी सुसंगत नाही, असा युक्तिवाद संघटनेकडून करण्यात आला आहे.

शनिवारी भोपाळ येथे झालेल्या राष्ट्रीय अधिवेशनात हा ठराव संमत करण्यात आला असून, विविध राज्यातील वितरकांनी याला पाठिंबा दिला आहे. संघटनेचे अध्यक्ष बी. एस. शर्मा यांनी याबाबत माहिती दिली.

LPG Strike Warning l बिगर-घरगुती सिलिंडर वाटपावरही आक्षेप :

संघटनेने आरोप केला आहे की, तेल कंपन्या कोणतीही मागणी न करता बिगर-घरगुती सिलिंडर वितरकांकडे पाठवत आहेत. हे प्रकार कायदेशीर तरतुदींच्या विरोधात आहेत आणि वितरकांवर आर्थिक बोजा वाढवत आहेत. हे तात्काळ थांबवण्याची मागणीही पत्रात करण्यात आली आहे. (LPG Strike Warning)

दरम्यान, उज्ज्वला योजनेअंतर्गत मिळणाऱ्या सिलिंडरच्या वितरणातही अडथळे येत असल्याचे संघटनेने नमूद केले आहे. अशा प्रकारांमुळे सामान्य लाभार्थ्यांनाही गॅस वेळेवर मिळत नाही, असा गंभीर मुद्दा त्यांनी उपस्थित केला आहे.

देशभरात सिलिंडरच्या दरात मोठी वाढ :

तसेच केंद्र सरकारने 7 एप्रिल 2025 रोजी घरगुती गॅस सिलिंडरच्या दरात 50 रुपयांची वाढ केली होती. त्यामुळे देशभरात सिलिंडरच्या दरात मोठी वाढ झाली आहे. (LPG Strike Warning)

दिल्ली: ₹803 → ₹853

मुंबई: ₹802.50 → ₹853.50

कोलकाता: ₹829 → ₹879

चेन्नई: ₹818.50 → ₹868.50

उज्ज्वला योजनेतील सबसिडीवर मिळणाऱ्या सिलिंडरच्या दरातही वाढ झाली आहे.

याशिवाय जर सरकारने जुलै 2025 पर्यंत वितरकांच्या मागण्या मान्य केल्या नाहीत, तर देशभरात LPG वितरण सेवा ठप्प होऊ शकते. परिणामी, ग्राहकांना गॅस सिलिंडर मिळण्यात अडचणी येण्याची शक्यता आहे.

News Title: LPG Distributors Threaten Nationwide Strike Over Low Commission; Home Delivery May Get Disrupted

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now