LPG Cylinder Rule | आखाती प्रदेशात सुरू असलेल्या तणावपूर्ण परिस्थितीचा परिणाम आता भारतातील स्वयंपाकघरांवरही दिसू लागला आहे. इराण (Iran) आणि अमेरिका (United States) यांच्यात वाढलेल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर घरगुती एलपीजी गॅस सिलिंडरच्या पुरवठ्याबाबत काही महत्त्वाचे बदल करण्यात आले आहेत. नव्या नियमांमुळे गॅस मिळण्याच्या प्रक्रियेत बदल झाल्याने नागरिकांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. (Iran US war impact)
सिलिंडर बुकिंगच्या कालावधीत बदल :
नवीन सूचनांनुसार घरगुती गॅस सिलिंडर बुक करण्यासाठी असलेला कालावधी वाढवण्यात आला आहे. यापूर्वी दुसरा सिलिंडर बुक करण्यासाठी ग्राहकांना १५ दिवसांची प्रतीक्षा करावी लागत होती. मात्र आता हा कालावधी वाढवून २५ दिवस करण्यात आला आहे. त्यामुळे महिन्याभरात केवळ एकच सिलिंडर पुरवला जाणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. (gas cylinder booking limit)
केंद्र सरकार (Central Government) यांनी गॅस वितरण करणाऱ्या कंपन्यांना याबाबत सूचना दिल्या असून व्यावसायिक आणि घरगुती दोन्ही प्रकारच्या सिलिंडरच्या वितरणावर मर्यादा ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. जिल्ह्यातील सर्व गॅस वितरकांना यासंदर्भात लेखी सूचना देण्यात आल्या आहेत. ग्राहकांकडून मोठ्या प्रमाणावर एकाच वेळी ऑनलाइन बुकिंग केल्याने वितरण व्यवस्थेवर ताण येत असल्याने काही अडचणी निर्माण होत असल्याची माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी महेश सुधाळकर (Mahesh Sudhalkar) यांनी दिली.
LPG Cylinder Rule | दरवाढ आणि तुटवड्याचा परिणाम :
दरम्यान तेल कंपन्यांनी घरगुती एलपीजी सिलिंडरच्या किंमतीत वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. १४.२ किलो वजनाच्या घरगुती सिलिंडरच्या दरात ६० रुपयांची वाढ करण्यात आली असून ही वाढ तत्काळ लागू करण्यात आली आहे. मागील ११ महिन्यांत झालेली ही दुसरी दरवाढ मानली जात आहे. उज्ज्वला योजना (Ujjwala Yojana) अंतर्गत मोफत एलपीजी कनेक्शन मिळालेल्या दहा कोटींहून अधिक कुटुंबांनाही या दरवाढीचा परिणाम सहन करावा लागणार आहे. (LPG Cylinder Rule)
याशिवाय व्यावसायिक वापरासाठी असलेल्या १९ किलो एलपीजी सिलिंडरच्या किमतीतही मोठी वाढ झाली आहे. हॉटेल आणि रेस्टॉरंटमध्ये वापरल्या जाणाऱ्या या सिलिंडरची किंमत ११४.५ रुपयांनी वाढून आता १८८३ रुपयांवर पोहोचली आहे. १ मार्चलाच या सिलिंडरच्या दरात २८ रुपयांची वाढ झाली होती. युद्धजन्य परिस्थितीमुळे गॅस पुरवठ्यावर परिणाम होत असल्याने अनेक ठिकाणी तुटवडा जाणवत आहे. दरम्यान, या परिस्थितीचा सर्वाधिक फटका हॉटेल उद्योगाला बसत असल्याचे दिसून येत आहे.






