Relationship Intimacy | आजकालच्या धकाधकीच्या जीवनशैलीमुळे अनेक जोडप्यांना एकमेकांशी शारीरिक संबंध ठेवताना अडथळ्यांचा सामना करावा लागतो. प्रेम असतानाही जर शारीरिक संबंधांची इच्छा कमी असेल, तर नातं बिघडण्याची शक्यता वाढते. पण योग्य मार्गदर्शन आणि संवादातून या परिस्थितीतून बाहेर पडता येऊ शकतं.
भावनिक नातं घट्ट करा, संवाद वाढवा-
संभोगाची (Relationship Intimacy) इच्छा कमी असण्यामागे अनेकदा भावनिक अंतर हे मुख्य कारण असतं. एकमेकांशी संवाद नसल्यास शारीरिक आकर्षणही कमी होतं. त्यामुळे जोडीदाराशी वेळ घालवणं, संवाद वाढवणं आणि भावनिक समजूत वाढवणं गरजेचं आहे. जोडीदाराच्या भावनांचा आदर करा, त्यांच्या मनातील गोष्टी समजून घ्या आणि नियमित गोड बोलत राहा.
छोट्या गोष्टींमध्ये प्रेम शोधणं, एकत्र जेवण घेणं, एकमेकांच्या अडचणी ऐकणं – या सगळ्या गोष्टी जोडीदारांमधील भावनिक जवळीक वाढवतात. अशा संवादातून विश्वास निर्माण होतो आणि नातं अधिक घट्ट होतं.
शारीरिक व मानसिक आरोग्यावर लक्ष केंद्रित करा-
थकवा, हार्मोनल असंतुलन, मानसिक तणाव – ही सगळी कारणं संभोगाची इच्छा कमी होण्यामागे असू शकतात. म्हणूनच नियमित व्यायाम, पोषक आहार, आणि योगसाधना केल्यास मन आणि शरीर दोघांचंही आरोग्य सुधारतं. ध्यान आणि प्राणायामामुळे तणाव कमी होतो आणि मन शांत राहतं. त्याचप्रमाणे, जोडीदारासोबत वेळ घालवणं, फिरायला जाणं, नवी ठिकाणं पाहणं यामुळेही नातं उत्साही राहतं.
शारीरिक संबंध म्हणजे फक्त कर्तव्य नाही-
कधी कधी नात्यात शारीरिक संबंध (Relationship Intimacy) केवळ एक कर्तव्य म्हणून केले जातात, आणि त्यामागे आनंदाची भावना नसते. अशा वेळी नातं अधिकच तणावपूर्ण होतं. म्हणून, शारीरिक संबंध म्हणजे प्रेमाची एक अभिव्यक्ती आहे हे लक्षात घ्या. यासाठी वेळ, वातावरण आणि दोघांची मनःस्थिती योग्य असणं गरजेचं आहे. शरीर आणि मन दोघंही तयार असतील, तरच नात्याला सकारात्मक ऊर्जा मिळते. प्रेम, सहवास, आणि परस्पर सन्मान यावर नात्याची आधारशिला असते.
जवळीक साधण्यासाठी वेगळे मार्ग वापरा-
शारीरिक संबंधांव्यतिरिक्त अनेक गोष्टींचा आधार घेऊनही एकमेकांशी जवळीक साधता येते. हातात हात घालून फिरणं, मिठी मारणं, प्रेमळ स्पर्श – अशा गोष्टी देखील नातं बळकट करतात. विशेषतः संभोगाशिवाय केलेले प्रेमाचे इशारे देखील खूप महत्त्वाचे असतात. तुमच्या नात्यात रोमँटिक गोष्टी वाढवा – उदाहरणार्थ, एकत्र चित्रपट बघणं, बाहेर जेवायला जाणं, एकमेकांना सरप्राईज देणं – अशा गोष्टीतून प्रेम व्यक्त करता येतं.
इंटिमसी म्हणजे केवळ संभोग नव्हे-
शारीरिक संबंधाशिवायही भावनिक आणि मानसिक इंटिमसी निर्माण करता येते. एकमेकांना समजून घेणं, वेळ देणं, एकत्र काहीतरी शिकणं किंवा करणे यामुळे नातं अधिक मजबूत होतं. संभोग म्हणजे प्रेमाचं एकमेव रूप नसून, त्यापेक्षा अधिक खोल नातं दोघांमध्ये असावं लागतं. संभाषण, सहवास आणि सहकार्य यांमुळेही प्रेम वृद्धिंगत होतं.






