लाखो विद्यार्थ्यांसाठी सर्वात मोठी बातमी! परीक्षा सुधारणा विधेयकाला लोकसभेची मंजुरी

On: July 29, 2026 4:31 PM
Examination Reform Bill
---Advertisement---

Examination Reform Bill | नीट (NEET) पेपरफुटी प्रकरणानंतर परीक्षा व्यवस्थेत सुधारणा करण्यासाठी केंद्र सरकारने आणलेले परीक्षा सुधारणा विधेयक (Examination Reform Bill) लोकसभेत (Lok Sabha) मंजूर झाले आहे. या विधेयकावर दीर्घ चर्चा आणि गदारोळानंतर आवाजी मतदानाद्वारे मंजुरी देण्यात आली. या विधेयकात पेपरफुटीसारख्या गंभीर गैरप्रकारांमध्ये दोषी आढळणाऱ्यांवर कठोर शिक्षा आणि मोठ्या दंडाची तरतूद करण्यात आली आहे.

गदारोळानंतर आवाजी मतदानाने मंजुरी :

नीट पेपरफुटी प्रकरणानंतर देशभरात तीव्र प्रतिक्रिया उमटल्या होत्या. कॉक्रोच जनता पार्टी (Cockroach Janata Party) यांनी केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान (Dharmendra Pradhan) यांच्या राजीनाम्याची मागणी करत आंदोलन छेडले होते. संसदेवर मोर्चा काढण्यात आल्यानंतर धर्मेंद्र प्रधान यांनी पदाचा राजीनामा दिला. त्यानंतर केंद्र सरकारने परीक्षा व्यवस्थेत सुधारणा करण्यासाठी परीक्षा सुधारणा विधेयक लोकसभेत मांडले.

या विधेयकावर सविस्तर चर्चा झाल्यानंतर लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला (Om Birla) यांनी आवाजी मतदान घेतले आणि विधेयकाला मंजुरी मिळाली. विधेयक मंजूर झाल्यानंतर अध्यक्षांनी दिवसभरासाठी लोकसभेचे कामकाज स्थगित केले. मात्र मतदानापूर्वी सभागृहात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार शाब्दिक चकमक झाल्याने वातावरण चांगलेच तापले होते.

Examination Reform Bill | राहुल गांधींच्या आरोपांवरून खडाजंगी :

लोकसभेतील चर्चेदरम्यान विरोधी पक्षनेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनावेळी विद्यार्थ्यांवर कारवाई करण्याचे आदेश गृहमंत्रालयाने दिल्याचा आरोप केला. त्यांच्या या वक्तव्यावर सत्ताधारी सदस्यांनी तीव्र आक्षेप घेत पुरावे सादर करण्याची मागणी केली. आरोप सिद्ध न झाल्यास राहुल गांधी यांनी माफी मागावी, अशी मागणीही सत्ताधारी सदस्यांनी केली.

या मुद्द्यावरून सभागृहात मोठा गोंधळ निर्माण झाल्याने लोकसभेचे कामकाज दोन वेळा तहकूब करावे लागले. त्यानंतर दुपारी तीन वाजता पुन्हा बैठक सुरू झाल्यावर परीक्षा सुधारणा विधेयक सभागृहात मांडण्यात आले आणि आवाजी मतदानाद्वारे ते मंजूर करण्यात आले. या विधेयकात पेपरफुटी किंवा परीक्षेतील गैरव्यवहारात दोषी ठरणाऱ्या व्यक्तींना कठोर शिक्षा तसेच मोठा आर्थिक दंड करण्याची तरतूद करण्यात आली आहे.

News Title: Lok Sabha Passes Exam Reform Bill

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now