पन्नास खोके, एकदम ओके… कोल्हापुरी ठसक्यातील गाण्याचा सोशल मीडियावर धुमाकूळ, पाहा Video

On: May 1, 2024 7:49 AM
Lok Sabha Elections 50 khoke ekdam ok video song viral in social media
---Advertisement---

Lok Sabha Elections | लोकसभेच्या निवडणुकीची सध्या देशभरात रणधुमाळी सुरू आहे. राज्यातही महायुती आणि महाविकास आघाडीकडून सध्या जोरदार प्रचार केला जातोय. काही दिवसांपूर्वी ठाकरे गटाने एका रॅप सॉन्गद्वारे आपला प्रचार करत शिंदे-फडणविस सरकारचा विरोध केला होता. सोशल मीडियावर हे सॉन्ग खूपच व्हायरल झालं.

आता पुन्हा एक सॉन्ग सध्या चर्चेत आलं आहे. कोल्हापूरच्या ठसक्यातील गाण्याचा हा व्हीडीओ सध्या चर्चेत आला आहे. राज्यात जेव्हा एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केली तेव्हा कॉँग्रेस, ठाकरे गट आणि राष्ट्रवादी यांच्याकडून शिंदे गटावर 50 खोके घेतल्याचा आरोप करण्यात आला होता. तेव्हा ‘पन्नास खोके,एकदम ओके’ अशी घोषणाबाजी देखील करण्यात आली होती.

म्हणायला ज्या नेत्यांनी 50 खोक्यांचा आरोप केला होता, त्यात अजित पवार स्वतः आणि त्यांच्या गटातील नेते देखील सामील होते.  आज हेच नेते शिंदे आणि भाजपासोबत सत्तेत जाऊन बसले आहेत. या पार्श्वभूमीवरच सध्या सोशल मीडियावर एक गाणं तूफान व्हायरल झालं आहे. ‘पन्नास खोके,एकदम ओके.. दादा.. आता तुम्ही नको पुन्हा’, अशा आशयाचं हे गाणं सर्वांचंच लक्ष वेधून घेत आहे.

व्हायरल व्हीडीओत काय?

व्हायरल होणाऱ्या व्हीडीओत काही तरुण 50 खोके, एकदम ओके अशा आशयाचं गाणं गाताना दिसून येत आहे. त्यात ते म्हणतात की, कोल्हापूरचा सन्मान, कोल्हापूरचा स्वाभिमान ..छाती आमची बुलंद.. भगव्यापुढे ताठ मान.. भगव्याचा साज हाय.. भगव्याची लाज हाय.. काय राव होता तुम्ही.. काय राव आज हाय?.. पन्नास खोके.. अबब.. एकदम ओके.. हे बरं हाय.

भगव्याचा आरसा, भगव्याचा वारसा.. दादा तुमच्या नावात दम नव्हता फारसा.. पन्नास खोके?.. तरी आम्ही जगलो,आमचंच म्हटलो.. आपलं ठरलंय! म्हणत आम्हीही पेटलो.. आमच्याच निष्ठेला लावलात तुम्ही चुना.. काय राव?.. ओ दादा .. नको आता ..तुम्ही पुन्हा.

पन्नास खोके.. एकदम ओके.. ओ दादा.. पन्नास खोके.. एकदम ओके.. जनतेचे उपकार झटक्यात विसरता.. इकडे-तिकडे उड्या आणि कुठे-कुठे घसरता?.. शोधायचं कुठं? कपात की बशीत?.. मत तुम्हाला देऊन खाटली आम्ही काशी.. विकासाच्या नावाने नेमकीच बोंब हाय.. शेतकऱ्यांचा नाही बरं आला कधी पुळका.. खोक्यापुढे यांचा स्वाभिमान गळका.. कशापाई केला सांगा हा गद्दारीचा गुन्हा? ..ओ दादा.. नको आता तुम्ही पुन्हा.. पन्नास खोके.. एकदम ओके.. अहो विकायला टाकलंय मराठी बाणा.. म्हणूनच म्हणतोय.. ओ दादा.. आता तुम्ही नको पुन्हा.. या आशयाचं गाणं असणारा हा व्हीडीओ आता चांगलाच व्हायरल झाला आहे. राज्यात निवडणुकामुळे (Lok Sabha Elections) राजकीय वातावरण चांगलंच तापलं असताना या सॉन्गने मात्र सर्वांचंच लक्ष वेधलं आहे.

News Title : Lok Sabha Elections 50 khoke ekdam ok video song viral in social media

महत्त्वाच्या बातम्या-

मावळात अनुभव पडतोय कमी, नवख्या उमेदवारामुळे ठाकरे गटाची दमछाक!

S E X स्कँडल प्रकरणी पहिली मोठी कारवाई; प्रज्वल रेवन्नाला मोठा झटका

चाणक्यानी सांगितलेल्या ‘या’ गोष्टी आयुष्यात यश मिळवण्यासाठी करतील मदत

रोहित शर्माला वाढदिवसाला मिळालं मोठं सरप्राईज, व्हिडीओ व्हायरल

पुण्याच्या ‘या’ रील स्टारसोबत राज ठाकरेंचं पहिलं रील, व्हिडीओ तूफान व्हायरल

Join WhatsApp Group

Join Now